नाशिक
नाशिकमधील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकून उत्तमनगर परिसरातील छोटू कोल्हापुरी या दुकानामधील वडापाव आणि इतर वस्तू तसेच तेल याचे सॅम्पल सोबत घेऊन पंचनामा करण्यात केला आहे. छोटू कोल्हापुरी या दुकानात वडापाव तळताना वापरण्यात येणारे तेल हे बदलले जात नाही. तसेच वडापाव चिकी टिक्की ही डीप फ्रिझरमध्ये ठेऊन वापरले जाते. म्हणजेच शिळे वडेपाव लोकांना खायला दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वडापाव खात असताना युसी पाहून वडापाव ताजा आहे का याची खात्री करूनच खावा कारण शिळे अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात.