नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी मध्ये ११ कोवीड रुग्णांचा मृत्यू झाला. याबाबत आता सरकारने चौकशीचे आदेश दिले असले तरी या नवीन इमारती बाबत अनेक प्रश्न आता समोर आले आहेत ही नवीन इमारत जेव्हा बांधली गेली तेव्हा त्या इमारती पूर्णत्वाचा दाखला कोणत्या आधारे दिला गेला याबाबत सवाल उठला आहे. तसेच महानगरपालिकेने केलेल्या फायर ऑडिट मध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत तर विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने 30 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीचे फायर ऑडिट करावे या बाबत स्थानिक प्रशासनाला सूचना द्याव्यात असे निवेदन दिले होते याची प्रत जिल्हाधिकर्यांना देण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं कालच्या घटनेवरून समोर येत आहे त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने विश्व मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष नावेद शेख जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे अज्जू शेख तसेच प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा यांनी केली आहे