Home शहर शहराच्या मुख्यबाजार पेठेत भुरट्या चोरांचा सुळसुळाट पोलिसांची गस्त वाढवण्याची व्यापाऱ्यांची मागणी

शहराच्या मुख्यबाजार पेठेत भुरट्या चोरांचा सुळसुळाट पोलिसांची गस्त वाढवण्याची व्यापाऱ्यांची मागणी

अहमदनगर दि १४ मार्च

अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठे मध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून रात्री-अपरात्री दुकाने फोडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.

विशेषतः कापड बाजार, शहाजी रोड ,नवी पेठ, जुना कापड बाजार, माणिक चौक, खिस्त गल्ली,गंज बाजार,सराफ बाजार या भागात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त घालत असतात मात्र पोलिसांची गाडी पुढे गेल्यानंतर चोरटे आपला डाव साधून छोटी मोठी दुकाने उचकटण्याचे प्रकार वारंवार होत आहे.

हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) जास्त प्रमाणात वाढवावी या मागणी करीताअहमदनगर कापड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि व्यापारी वर्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन  निवेदन देऊन पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version