अहमदनगर दि.२० डिसेंबर
आकांक्षां पुढती जिथे गगन ठेंगणे. महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं आणि गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देणारं कळसुबाई शिखर. मात्र अवघ्या साडेचार वर्षे वयाच्या पियुष अनिल सानप या बालवीराने महाराष्ट्रातील सर्वोच्च सर केलं आहे अहमदनगरच्या या पियुष सानप याने हे शिखर अवघ्या तीन तासात पार केलं. तीन तासात ५ हजार ४००फूटाचा सुळका सर केल्याबद्दल पियुषचे कौतुक होत आहे कळसूबाई शिखर ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाते.
कळसुबाई पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर एवढी आहे. हे शिखर चढणे कुणाचेही काम नाही. पण पियुष सानप या साडेचार वर्षीय चिमुकल्याने हे करून दाखवले आहे. नगर जिल्ह्य़ातील बारी या गावातून त्याने सकाळी ७.३५ वाजता चढाई सुरू केली, तर ११ वाजता त्याने कळसूबाई मातेचे दर्शन घेतले. अवघ्या तीन तास पंचवीस मिनिटात त्याने हे शिखर सर केले.
त्याच्याबरोबर त्याच्या आई वडील आणि भावाने ही हे शिखर सर केले कोणाचीही मदत न घेता पियूषने उंच उंच दगडांवरून एखाद्या सराईत ट्रेकर प्रमाणे मोठं मोठे सुळे पार केले. ट्रेक यात्री या गिर्यारोहक संस्थे सोबत चढाई पार केली.या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.