Homeविशेषसामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संपुर्णा सावंत राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संपुर्णा सावंत राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

advertisement

अहमदनगर दि.२३ जानेवारी
जिल्हा क्रीडा कार्यालय आणि स्व. पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था तसेच श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा संपुर्णा किसनराव सावंत यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पारनेर तालुक्याचे आमदार निलेश सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संपूर्णा सावंत या लायन्स क्लब इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा आणि जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहताना सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असतात बेटी पढाव बेटी बचाव,रक्तदान शिबीर, तसेच वृक्षारोपण,स्वछता मोहीम,कचरामुक्त शहर, महिला सक्षमीकरण असे विविध कार्यक्रम राबवून सामाजिक कार्यात केलेल्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी प्रकाश मोहारे ,नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात,डॉ. शैलेंद्र भणगे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थीत होते.

 

चूल आणि मूल सांभाळणे ही व्याख्या मोडून काढत महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आली आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केल्याने इतर महिलांना काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते तर राजमाता जिजाऊ यांच्या नावाने हा सन्मान दिला जात असल्याने सन्मानित झालेल्या महिलांनाही ही जबाबदारी तेवढ्याच जबाबदारीने पुढे न्यावी लागते असं प्रतिपादन यावेळी बोलताना आमदार निलेश लंके यांनी केलं.

संपुर्णा किसनराव सावंत यांच्या सोबत, रुपाली विजय जाधव ,श्रीमती अलका भाऊसाहेब गायकवाड यांना सुद्धा सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन नाना किसन डोंगरे, मंदाताई नाना डोंगरे ,प्रतिभा नाना डोंगरे,संदिप नाना डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते.तसेच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपल्या नंतर रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते गावातील अनेक युवकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले तसेच युवा मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

सार्थ इस्टेट एजन्सी प्लॉट, फ्लॅट, बंगले, मोकळे प्लॉट, शेत जमीन खरेदी विक्री साठी विश्वसनीय ठिकाण संपर्क 8999306565

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular