Homeविशेषनगर शहरातील जादुई दिवे सात वर्षात एकदाही न लागलेल्या दिव्यांवर लाखोंचा खर्च

नगर शहरातील जादुई दिवे सात वर्षात एकदाही न लागलेल्या दिव्यांवर लाखोंचा खर्च

advertisement

अहमदनगर दि.२३ जानेवारी
अहमदनगर काना मात्रा नसलेले शहर अहमदनगर शहरात काहीही घडू शकते असं नेहमीच बोलले जाते आणि त्याचे अनेक उदाहरणेही नगर शहरात घडलेले आहेत. ऐतिहासिक नगर शहरात अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि अनेक ऐतिहासिक गोष्ट होत आहेत.

नगर शहरातील सावेडी उपनगरामधील अत्यंत महत्त्वाचा असलेला चौक म्हणजे प्रोफेसर कॉलनी चौक या चौकामध्ये २०१५-१६ साली आकर्षक असे पथदिवे लावण्यात आले होते. या एका पथदिवे ची किंमत सुमारे ५० हजार ते एक लाख रुपये दरम्यान असल्याचे बोलले जाते आणि जवळपास 50 ते 60 दिवे लावण्यात आले होते. विशेष म्हणजे हे पथदिवे लावल्यापासून आजपर्यंत म्हणजे २०१५- २०१६ पासून ते आज पर्यंत या पथदिव्या मधील एकही बल्ब लागलेला नाही. पथदिवे का लावण्यात आले कोणासाठी लावण्यात आले असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे मात्र त्यांना अजूनही उत्तर मिळालेले नाही .

अत्यंत आकर्षक आणि जुन्या पद्धतीने नक्षीकाम असलेले हे पथदिवे प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी लावण्यात आले होते. लाखो रुपयांचा निधी त्यासाठी उपलब्ध करण्यात आला होता तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांचा हा प्रभाग होता आणि त्यांच्या संकल्पनेतून हे पथदिवे बसविण्यात आले होते अशी माहिती मिळतेय मात्र महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून २०१५ ते २०२२ पर्यंत एकदाही लाईट न लागलेले हे पोल खरंच ऐतिहासिक म्हणावे लागतील.

या पथदिव्या बाबत काही वर्षा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच समजले नाही.

नगर शहरातील नागरिकांनी कर भरायचा आणि त्याची उधळपट्टी अशा प्रकारे होत असेल तर नागरिकांनी कर का भरावा? हे लाखो रुपयांचे पथदिवे गेल्या कित्येक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत तर काही पथदिव्यांची अनेक साहित्य चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे फक्त शोभते हे दिवे बसले होते का? कोणाचा आर्थिक फायद्यासाठी या दिव्यांचा उपयोग झाला का? असे प्रश्न आता समोर येत आहेत.

विशेष म्हणजे हे दिवे लावणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांनी भविष्यवाणी केली होती की हे दिवे कधीच लागणार नाहीत. ती भविष्यवाणी खरच खरी ठरली असून दिवे आज पर्यंत लागले नाहीत.काही लहान मुलांना या परिसरातील नागरीक इंग्रजांच्या काळातील हे पथदिवे असल्याचं मिश्कीलपणे सांगतात.लाखो रुपयांचा खर्च झालेल्या निधीतील या पथदिव्यांची लाईट कधी लागणार यासाठी नागरिक डोळ्यात तेल घालून बसले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular