अहमदनगर दि.१२ जानेवारी-
दुकानाच्या जागेवरून नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील एका व्यापाऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली असून मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर व्यापारी या मारहाणीत जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत आज या तरुण व्यपऱ्याच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली असून शहरात कायदा सुव्यवस्था कोलमडली असल्याचं सांगितलं आहे. बी बियाणे खते विक्रीचे व्यापारी अजय बोरा यांचे मार्केट यार्ड परिसरात दुकान आहे या दुकानाच्या जागेबाबत त्यांच्या चुलत भावंडांची त्यांचे घरगुती वाद चालू आहेत मात्र अजय बोरा यांचा नातेवाइकांनी ही ही जागा परस्पर बेकायदेशीर औसारकर नावाच्या व्यक्तीला विकल्यानंतर ही व्यक्ती जागा खाली करण्यासाठी गावगुंडांना घेऊन अजय बोरा यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करत आहेत तसेच जागा खाली करत नसल्याने भाडोत्री गुंड आणि भाडोत्री महिलांचा वापर करून खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पर्यंत अजय बोरा यांनी औसारकर यांच्याविरोधात दहा ते बारा तक्रारी पोलिस ठाण्यात केले आहेत मात्र अद्यापही या मुद्द्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप आले बोरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे.
शुक्रवारी भरदिवसा याच गुंडांनी अजय गोरा यांच्या दुकानात घुसून अजय बोरा यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बंदूक, धारदार शस्त्राचा धाक दाखवून हत्या करण्याची देखील धमकी देण्यात आल्याचे बोरा यांनी सांगितले. बोरांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लिखित अर्ज करून संरक्षण मागून देखिल दिले गेले नाही. वेळीच संरक्षण दिले असते तर बाजारपेठेत गुंडांची धुडगूस घालण्याची हिंमत झाली नसती. बोरा कुटुंबीयांना व व्यापाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी घटनेची माहिती समजताच किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवर संपर्क साधत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, अनंतराव गारदे, खलील सय्यद आदींसह कार्यकर्ते गुन्हा दाखल होईपर्यंत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. दरम्यान काल रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी बोरा यांच्या फिर्यादीवरून भादवी १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४,५०६, शशस्त्र अधिनियम ३, २५ अन्वये अजित औसारकर, अनील औसारकर, सुजित औसरकर, यांच्यासह अन्य वीस ते पंचवीस अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अजय बोरा यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, शहारातील बड्या राजकीय प्रस्थाशी नातेसंबंध असणाऱ्या शशिकांत घिगे यांनी ही जागा खाली करून घेण्यासाठी आमच्यावर अनेकदा दबाव आणला. या व्यवहारातील घिगे हाच मूळ मध्यस्थ आहे. तेवढ्यावर समाधान झालं नाही म्हणून त्यांनी तृतीयपंथी, महिला भगिनी, गुंड यांना आमच्यावर सोडलं. विनयभंग, ॲट्रॉसिटीची धमकी दिली. औसरकर यांना केवळ चेहरा म्हणून पुढे करण्यात आले आहे. धमक्या, दरोडा, मारहाण, छळवणूक, शोषण यामुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. ४-५ महिन्यांच्या अल्प कालावधीत १२ फिर्यादी दाखल झाल्या आहेत. फिर्यादी दाखल होऊन देखील पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अशा दहशतीत या शहरात व्यापाऱ्यांनी जगायचे तरी कसं ? असा उद्विग्न सवाल यावेळी बोरा यांनी उपस्थित केला.
किरण काळे म्हणाले की, जागा वादाचा न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असताना देखील राजकीय वरदहस्तातून व्यापार्यांच्या खाजगी मालमत्तांवर बेकायदेशीर ताबा मारण्याचा डाव सुरू आहे. याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. मात्र अशा पद्धतीने बाजारपेठेत व्यापाऱ्यांवर कोणी दहशत करत असेल तर काँग्रेस ती खपवून घेणार नाही. सीए ऋषभ बोरा या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्याच्या मनात यामुळे नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सीए होण्यापेक्षा मी गुंड झालो असतो तर बरे झाले असते अशी उद्विग्न भावना त्याने व्यक्त केली आहे.
घाबरु नका… अनिलभैय्या नसले, तरी किरणभाऊ आहेत…
व्यापारी, उद्योजक, पीडित, अन्यायग्रस्त यांच्या मनामध्ये शहराला कोणी वाली उरला नसल्याची भावना निर्माण झाली आहे. स्व. अनिलभैय्या यांनी दहशतीच्या विरोधात कायम शहराला संरक्षण देण्याचे काम केले. आज तेच काम किरणभाऊ काळे करीत आहेत. केवळ भीतीपोटी अनेक व्यापारी पुढे यायला धजावत नाहीत. आज बोरा या व्यापारी कुटुंबावर वेळ आली आहे. त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे हे हृदयद्रावक प्रकरण उजेडात आले आहे.
अंधारात अनेकांवर ही वेळ यापूर्वीच आलेली आहे. उद्या बोरांच्या जागी अन्य व्यापारी, उद्योजक देखील असणार आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये अन्यायग्रस्तांचा आवाज म्हणून निर्भीडपणे लढणाऱ्या किरणभाऊ भाऊंच्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. अन्यायग्रस्त व्यापारी, उद्योजकांनी यापुढे निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन करत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की त्यांना किरण भाऊंच्या माध्यमातून काँग्रेस त्यांना न्याय देण्याचे काम करेल.