Home शहर सुरक्षारक्षकाचा मुलगा झाला पीएसआय नगरच्या अंकितने मिळवले स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

सुरक्षारक्षकाचा मुलगा झाला पीएसआय नगरच्या अंकितने मिळवले स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

अहमदनगर दि १५ मार्च

वडील खाजगी सुरक्षारक्षक तर आई धुणे भांडे करून घराचा प्रपंच चालवणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेल्या अंकित सोनवणे याने परिस्थितीवर मात करून पीएसआय होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलंय.

महानगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अंकित सोनवणे त्याचे वडील थॉमस सोनवणे आणि आईचा सत्कार करण्यात आला गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या अंकित याने परिस्थितीवर मात करून पीएसआय होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केले आहे .

 

घरी अठरा विश्व दारिद्र्य.. आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. आई-वडिलांसोबत कामात तर मदत केलीच तसेच ज्यूडो आणि कुस्तीची आवड असल्याने खेळला वेळ देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

काही करण्याची इच्छा असेल तर त्याच्या स्वप्नांना कोणीही रोखू शकत नाही हेच अंकित सोनवणे यांनी दाखवून दिला आहे अंकित सोनवणे याची पी एस आय पदी निवड ही खेळाडू साठी राखीव असलेल्या कोट्यातून झाली असून या निवडीमुळे त्याच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज आपल्या मुलाच्या परीक्षेमधून मिळालेल्या यशातून पूर्ण झाल्या असल्याच्या भावना अंकीतच्या आईवडिलांनी बोलून दाखवल्या.

खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने गरिबीशी लढत आणि कुस्ती आणि जुडो या खेळात सातत्य राखून अंकित सोनवणे याने आकाशाला गवसणी घातली आहे.

काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version