अहमदनगर -दि.१९ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांसह काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ऑडिओ व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या क्लिप बद्दल नंतर काय कारवाई होती हे कळतच नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यातील एक क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास सुरू असून चार दिवसापूर्वी बायोडिझेल प्रकरणातील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. त्याआधी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या नेवासा, अकोला, येथील काही कर्मचारी या क्लिपचे बळी झालेले आहेत. एक मात्र विशेष आहे की या क्लिप काही ठराविक वेळेसच व्हायरल केल्या जातात आणि त्याचा नेमका उपयोग झाल्यानंतर त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. या क्लिप बाबत पोलिसांनी सखोल तपासणी करणे गरजेचे आहे कारण अशा क्लिप व्हायरल करण्यामागे कोणाचा काय हेतू असतो हे पण लक्षात घेणे आता गरजेचे आहे. कोतवाली पोलीस स्टेशनची बायोडिझेल बाबत ची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता अजून एक जुनी नाजूक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही क्लिप जुनी आहे या व्हिडीओ क्लिप बाबत यशस्वी महिला संघटनेच्या अध्यक्षांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना आणि पोलिस निरीक्षकांना या बाबत निवेदनही दिले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुन्हा ती क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिप मध्ये एक कर्मचारी महिलेशी अश्लील चाळे करत असल्याचे सीसी टीव्हीचे फुटेज आहे. या क्लिप बाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे मात्र पोलिसांनी अशा क्लिप व्हायरल होण्यामागचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. कारण विनाकारण काही कर्मचाऱ्यांची आणि पोलिस खात्याची बदनामी केली जाते त्यामुळे अशा क्लिप व्हायरल करणाऱ्यांचा सखोल तपास करून शोध लावणे गरजेचे आहे. नाहीतर कर्मचारी आणि खात्याची नाहक बदनामी होत चालली आहे.
ती क्लिप नेमकी कोणाची… वाचत राहा …आवाज महाराष्ट्राचा मराठी न्यूज वेब पोर्टल