Home जिल्हा हॉटेल लोकसेवा मध्ये ठेकेदाराकडून खंडणी घेताना पत्रकार झाला जेरबंद

हॉटेल लोकसेवा मध्ये ठेकेदाराकडून खंडणी घेताना पत्रकार झाला जेरबंद

सोलापूर दि ८ एप्रिल
महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला खंडणी मागणाऱ्या पत्रकारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पेनूर (ता. मोहोळ) याठिकाणी घडलो असून नेताजी शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांचे नाव आहे.

मी दैनिक माणदेश नगरी या वृत्तपत्राचा पत्रकार असून माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या बातम्या छापणार नाही, मला पैसे द्या, अन्यथा तुम्हाला अडचणीत आणू शकतो अशी धमकी देऊन शिंदे ठेकेदारा कडे पैशाची मागणी करू लागल्याने अखेर वैतागलेल्या ठेकेदार प्रशांत गिड्डे यांनी पोलीस ठाणे गाठून शिंदे याने आजपर्यंत फोनद्वारे दिलेल्या त्रासाची माहिती सांगितली.त्या नुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेऊन पत्रकार शिंदे याला सापळा रचून हॉटेल लोकसेवा मध्ये 25 हजार रुपये घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

प्रशांत गिड्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३५ हजार रुपयांची खंडणी घेऊन धमकी दिल्याप्रकरणी नेताजी शिंदे यांच्यावर भा. द.वि. ३८७, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version