शिर्डी– नजीकच्या काळात होवू घातलेल्या विविध निवडणूकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये या करिता राज्य निवडणूक ekection आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून जास्तीत जास्त नव मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन राहाताचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कुंदन हिरे kundan hire यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात कुंदन हिरे यांनी म्हटले आहे की, १ जानेवारी २०२२ वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार म्हणून यादीत नाव समविष्ट करू शकतो. नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमले आहेत. ०५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार voter यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत. तसेच विविध राजकीय पक्ष पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी असे आवाहन ही कुंदन हिरे यांनी केले आहे.
आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ मध्ये होत असून यासाठी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दिनांक २७ व २८ नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आले आहे. यात नाव name नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणे शक्य आहे. दि. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक nivadnuk ayog आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ. अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा.असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.