अहमदनगर दि.८ मार्च
बुलढाणा जिल्ह्यात ३ मार्चला गणिताचा पेपर सुरु होण्याच्या पाऊण तास आधी सिंदखेडराजा तालुक्यातील अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. याबाबतची माहिती एकाने तत्काळ वृत्तवाहिनीला दिल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.
माहितीच्या धाग्याच्या आधारे साखरखेर्डा पोलिसांनी राजेगाव येथील परीक्षा केंद्रावरील उपप्रमुख गोपाल दामोधर शिंगणे या शिक्षकाला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्या मोबाईलवरून भंडारी गावातील काही लोकांच्या व्हॉट्सअॅपवर गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो पाठवल्याचे दिसून आले होते
सात आरोपींच्या मोबाईल कनेक्शनवरून पेपरफुटीचे धगोदोरे अहमदनगर जिल्ह्यापर्यंत आल्याचं पोलीस तपासात समोर आले असून मुंबई येथील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक च्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील रूई छत्तीसी एका शिक्षण संस्थेच्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे यामध्ये अहमदनगर शहरातील बलिकाश्रम रोड वरील एक शिक्षक रुईछत्तीसी येथील शिक्षिका वाटेफळ येथील एक उच्चशिक्षित शिक्षक तसंच श्रीगोंदा तालुक्यातील एक वाहन चालक आणि कर्जत तालुक्यातील एक शिक्षक अशा पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे.