Homeशहरशिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचा फोटो त्या फलकावर झळक्याने शिवसेनेच्या...

शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचा फोटो त्या फलकावर झळक्याने शिवसेनेच्या एका गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त

advertisement

अहमदनगर दि.५ मार्च

अहमदनगर शहरातील राजकारण आता बदलत चालले असून एकेकाळी कट्टर राजकीय विरोध असणाऱ्या दोन नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर लागल्याने अहमदनगर मध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. याला कारण आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे हे सभापतीपदी विराजमान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या शुभेच्छांचे फलक अहमदनगर शहरात विविध ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत. मात्र या फलकांवर एकेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे फोटो एकाच फलका लागले असून हा दुर्मिळ योगायोग म्हणावे लागेल.

अहमदनगर शहरातील राजकारणात राठोड विरुद्ध जगताप हे कट्टर राजकीय विरोधक होते स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांनी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला होता आणि मागील विधानसभेत झालेल्या पराभवानंतर ही धार तीव्र झाली होती. अहमदनगर शहराच्या राजकारणात आत्तापर्यंत कधीहीस्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे फोटो बॅनरवर झळकले नव्हते मात्र माजी आमदार अनिल राठोड यांच्या कोरोनामध्ये झालेल्या निधनानंतर ही किमया त्यांच्या समर्थकांनी घडवली असली तरी याला एका गटाने विरोध केला असून नगर शिवसेना या नावाने सुरू असलेल्या शिवसेनेच्या फेसबुक पेज वर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली होती मात्र अहमदनगर शहरात या आघाडीचे अस्तित्व अद्यापही दिसले नाही काँग्रेसचा एक गट आणि शिवसेनेचा एक गट अजूनही राष्ट्रवादी पासून दूर असून फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच दोन्हीही गट राष्ट्रवादीवर वेळोवेळी निशाणा साधत असतात

महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने जरी सत्ता ताब्यात घेतली असली तरी शिवसेनेमधील एक गट अजूनही राष्ट्रवादी पासून दूर आहे आणि वेळोवेळी हे अनेक वेळा सिद्धही झाले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular