अहमदनगर दि.24 नोव्हेंबर
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा धोंडीबानगर येथे योगेश बन्सी मोरे याच्या घराच्या गच्चीवर मोठा जुगार अड्डा चालू होता याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि डी. एस. मुंडे, पोसई सोपान गोरे, सहा. फौजदार व्हि.जे. घोडेचोर, पोह.बी. आर. फोलाने, पोना एस.एस. चौधरी, पोना बी.के. खरसे, पोना एल.सी.खोकले, पोकों आर. पी. जाधव, पोकॉ वाय. ए. सातपुते, चालक पोहवा यु.एम. गावडे, चालक पोहेकॉ सी.पी. कुसळकर यांच्या पथकाने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कोपरंगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, ज्यांना माहिती देऊन कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात असलेले धोंडीबा नगर येथील योगेश मोरे यांच्या घराच्या गच्चीवर छापा टाकला यावेळी जवळपास 28 लोक जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले या पत्ते खेळणाऱ्या जुगारी लोकांकडून मोबाईल तसेच त्यांचे चार चाकी वाहने दुचाकी वाहने आणि जुगार मध्ये लावलेले पैसे असे एकूण 23 लाख 35 हजार 370 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शंकर चौधरी यांचे फिर्यादीवरून म.ज.का.कलम १२ (अ) प्रमाणे गुळा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे वासुदेव देसले, यांनी केले आहे.
क्रेटा,स्कोडा,आल्टो, अशा महागड्या चार चाकी गाड्यांसह दुचाकी वाहने आणि महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत या ठिकाणी मोठमोठे प्रतिष्ठित नागरिक पत्ते खेळण्यासाठी येत असतात.