Home शहर 32 खोके कोण ओके … शिंदे गट शिवसेना ,कांग्रेस,भाजपने नगररचनाकार राम चारठाणकर...

32 खोके कोण ओके … शिंदे गट शिवसेना ,कांग्रेस,भाजपने नगररचनाकार राम चारठाणकर यांना घातला घेराव

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर –

नगरसेवकांचा विरोध आणि आयुक्तांनी उपस्थित केलेले मुद्रे दुर्लक्षित करून सावेडी परिसरात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेली जागा सोडून सुमारे चार एकर नवीन जागेसाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करून भूसंपादन प्रस्तावाला प्रस्तावाला महापौर रोहिणी शेंडगे यांनी महासभेत मान्यता दिली होती.हे प्रकरण आता चांगलेच तापले असून या प्रस्तावाला ,शिंदे गट शिवसेना तसेच काँग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध असून आज महानगरपालिकेत या सर्वांनी महानगरपालिकेचे नगररचनाकार राम चारठाणकर
यांना घेराव घातला होता.

बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अनिल शिंदे,शहर प्रमुख दिलीप सातपुते, शहरजिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे दशरथ शिंदे भाजपचे नगरसेवक प्रदीप परदेशी आदींनी नगररचनाकार राम चारठाणकर यांना चांगलेच धारेवर धरले होते.

याबाबत गृहविभागाकडे तक्रार करण्याबरोबरच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला तर आरक्षित जागा अधिग्र करण्याचा पूर्ण अधिकार हा महानगरपालिकेल असताना हा अधिकार प्रशासन का वापरत नाही आणि नवीन जागेसाठी ३२ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट का घातला जात आहे. त्यामुळे ही जागा खरेदी करण्याला
आमचा विरोध कायम राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

तर नगर मनमाड महामार्गलगत एमआयडीसी पूल उतरल्यानंतर सात एकर ची जागा असून त्या ठिकाणी स्मशानभूमी दफनभूमी आणि ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीची जागा आरक्षितआहे. तसा ठरावही पालिकेत झाला असून त्या जागेचे मालक सोनवणे महानगरपालिकेला जागा देण्यासही तयार आहेत. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे.या बाबत न्यायालयात लढा चालू आहे मात्र ही मोफतची जागा न घेता 32 कोटी रुपये खर्च करून महानगरपालिका आडवळणाची जागा का घेते हे मोठे गौडबंगाल असल्याचं शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी यावेळी सांगितलं.

अहमदनगर शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयानीय झाली असून दुरुस्ती साठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत तसेच अनेक विकास कामे पैशांअभावी थांबले आहेत ते सोडून 32 कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमीसाठी जागा घेणे हे महानगरपालिकेला परवडणारे नसून यामुळे नगरकरांमध्ये संतापाची भावना झाली आहे. या विरोधात संपूर्ण नगर शहरातील नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी दिला

या 32 कोटी रुपयांच्या खरेदीला सत्ताधारी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यासह नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक अमोल येवले यांनी महापौर यांना निवेदन देऊन लेखी विरोध केला आहे.तर आज भाजपचे नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन या प्रस्तावाला लेखी विरोध केला आहे.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version