नगर, : अकोळनेर,तालुका नगर,जिल्हा अहिल्यानगर येथे भारतातील सर्वात मोठ्या आणि भव्यदिव्य अशा 2525 कुंडात्मक महाशिवयाग सोहळ्याचे आयोजन सदगुरु शंकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.रविवार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या सोहळ्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, सर्व सेवा ही मोफत असणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुंडात्मक शिवयाग यापूर्वी कोठेही झालेला नसल्याने हा सोहळा संपूर्ण भारतात लक्षवेधी ठरत आहे.या सोहळ्याची संपूर्ण तयारी अकोळनेर येथील भव्यतीर्थक्षेत्री झाली असून राज्यभरातून हजारो भाविक या पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सदगुरु शंकर महाराज मठ, शिवाजीनगर, केडगाव यांच्याकडून देण्यात आली आहे.

🔴 होम हवन साठी आणावयाचे साहित्य.🔴
ताम्हण १, ताट १, गडवा १, वाट्या 2, चमचे 2, बसायचे आसन 2, काळे तीळ अर्धा किलो,साखर एक किलो,तूप एक किलो,(मठा मध्ये उपलब्ध केले जाईल.) खोबरेवाटी एक, हार- फुले -प्रसाद स्व इच्छेने. बेलपत्र १०८, हळदकुंकू, गंध, अक्षदा,कापूर,अगरबत्ती, काडीपेटी.
🟣कार्यक्रमाची रूपरेषा.🟣
👉 सकाळी सहा ते आठ – श्रींचा महारुद्र अभिषेक.
👉 सकाळी आठ ते बारा – भव्यदिव्य महाशिवयाग सोहळा.
👉 दुपारी बारा ते एक – महादेवांचा पालखी सोहळा.
👉 दुपारी एक ते दीड – शिवपार्वती विवाह सोहळा.
👉दुपारी दीड ते तीन – भजन सेवा.
👉दुपारी दोन ते पाच महाप्रसाद.
🔴 टीप – आपला पेहराव हा पारंपारिकच असावा.महिलांनी पांढरी साडी तसेच पुरुषांनी पांढरा कुर्ता पायजमा परिधान करणे अनिवार्य आहे. 🔴





