Homeविशेष१० वर्षांच्या सुलतान शोहेब जहागीरदारचा आदर्श उपक्रम; रमजानमध्ये पूर्ण ३० रोजे पूर्ण

१० वर्षांच्या सुलतान शोहेब जहागीरदारचा आदर्श उपक्रम; रमजानमध्ये पूर्ण ३० रोजे पूर्ण

advertisement

अहिल्यानगर : पवित्र रमजान महिन्याच्या आध्यात्मिक वातावरणात, केवळ १० वर्षांच्या सुलतान शोहेब जहागीरदार या चिमुकल्याने पूर्ण ३० रोजे (उपवास) यशस्वीरीत्या पूर्ण करत एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. एवढ्या लहान वयात इतकी चिकाटी, श्रद्धा आणि संयम दाखवल्यामुळे बेलदार गल्ली , तेलीखूंट परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Oplus_0

रमजान हा केवळ उपवासाचा नव्हे, तर आत्मशुद्धी, संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा महिना आहे. सुलतानने हे सर्व गुण आपल्या कृतीतून दाखवून दिले. दिवसभर उपाशी-तापशी राहूनही त्याने नमाज, कुरआन पठण आणि इतर धार्मिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली. त्याच्या या प्रयत्नांमुळे केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण समाज भावूक झाला आहे.

सुलतानच्या या यशामागे त्याच्या कुटुंबीयांचा मोठा आधार आहे.
सुलतान हा सामाजिक कार्यकर्ता साहेबानं जहागीरदार यांचा भाचा असून सामाजिक कार्यकर्ते पप्पू जहागीरदार यांचा नातू आहे.जहागीरदार परिवारा ने सुलतान ला योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि धार्मिक संस्कार दिल्यामुळेच त्याने हे कठीण वाटणारे उद्दिष्ट सहज पूर्ण केले. “लहान वयातच मुलांमध्ये चांगले संस्कार रुजले, तर ते पुढे समाजाचे आदर्श नागरिक बनतात,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

या घटनेमुळे सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेशही अधोरेखित झाला आहे. विविध धर्म आणि समाजातील लोकांनी सुलतानचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात प्रेम, बंधुता आणि एकोप्याचा सुंदर संदेश समाजात पसरला आहे.

सुलतान शोहेब जहागीरदारचा हा प्रेरणादायी प्रवास इतर मुलांसाठीही एक आदर्श ठरत असून, श्रद्धा आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular