Homeक्राईमनवऱ्याला रक्ताच्या उलट्या करून ठार मारेल अशी धमकी देत महिलेकडून उकळले साडे...

नवऱ्याला रक्ताच्या उलट्या करून ठार मारेल अशी धमकी देत महिलेकडून उकळले साडे दहा लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम ..बंटी और बबलीचा कारनामा l..

advertisement

अहिल्यानगर

जग एक विश्व शतकाकडे जात असतानाही अजूनही काही लोक देवाच्या नावाने भीती घालून भोळ्या भाबड्या भक्तांना लुबाडण्याचे काम करत आहेत.
अहिल्यानगर शहरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून गणेश उर्फ टिंग्या पोटे नामक इसमाने एका 44 वर्षीय महिलेला नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देत तब्बल साडेदहा लाख रुपये किमतीचे सोने घेऊन तिला गंडा घातला आहे.

जावाबत घडलेली हकीकत अशी की वृषाली भगत या महिलेचा भोळेपणाचा आणि तिच्या आजाराचा फायदा घेऊन गणेश उर्फ टिंग्या पोटे आणि त्याची पत्नी वर्षा खाडे या दोघांनी मिळून वृषाली भगत हिच्या नवऱ्याला रक्ताच्या उलट्या करून मारून टाकेल अशी धमकी देतो वेळोवेळी सोने आणि रोख रक्कम उकळली. भगत या आपल्या माहेरी गेल्या असताना त्या ठिकाणी दूध घेण्यासाठी आलेल्या गणेश उर्फ टिंग्या पोटे येणे महिलेच्या तुम्ही आजारी आहात का मी तुमचा आधार बोलून करून देऊ शकतो असे बोलून विश्वास संपादन केला आणि हळूहळू त्या महिलेला खोटी कारणे देत सोनू आणि पैसे उकळले. सुरुवातीला त्याने त्या महिलेला विभूती देऊन ही रोज एक चमचा घेत जा तुमचे सर्व आजार दूर होतील असे सांगितले त्यानंतर विश्वास संपादन करून त्या महिलेचा फोन नंबर घेतला आणि त्या महिलेला संपर्क करून रोज वेगवेगळे कारणे देत आजार बरा करण्याच्या नावाखाली कधी देवाला सोन्याची नथ करायची आहे असे सांगून तर कधी वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेकडून सोनं घेत राहिला जेव्हा जेव्हा महिलेने सोनं देण्यास किंवा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तेव्हा गणेश उर्फ टिंग्या पोटे याने “तू सोन नाही दिले तर माझे गुरु मार्फत तुझे नवऱ्याला मारुन टाकील, त्याला रक्ताच्या उलट्या करायला लावील” अशी धमकी देत असे

25 तोळे सोने घेऊनही गणेश उर्फ टिंग्या पोटे याची तहान भागात नव्हती तरी पुन्हा त्याने त्या मुलीकडे 70 हजार रुपयांची मागणी केली यावर कंटाळून भगत यांनी अखेर गणेश उर्फ टिंग्या पोटे याला चांगलेच खडसावले आणि तुला एवढे पैसे आणि सोने देऊनही तुला काहीच वाटत नाही का? तू मला अजून सोन्याची नथ करुन दिली नाही व तू अजून तुझे गुरु कडुन काणेती विधी केलेली दिसत नाही, “तु माझे सोने मला परत दे” असे बोलू लागल्यावर तो मला म्हणाला की, “तू काही बोलू नको माझा गुरु तूझे नवऱ्याचे नाका तोंडातून रक्त पाडील सर्व उलटे पालट करून टाकीन, तुम्हाला उध्वस्त करील” मी त्याला त्यावर बोलेले की, माझ्याकडे पैसे नाही त्यावर तो मला बोलला की “तुझा नवरा सजून सडून मरण” असे बोलला व त्याने फोन कट केला.

या प्रकरणानंतर अखेर वैशाली भगत यांनी थेट पोलीस ठाणे गाठून गणेश उर्फ टिंग्या पोटे आणि त्याची पत्नी वर्षा पोटे या दोघां विरोधात तक्रार दाखल केली आहे. बघ त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमांद्वारे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular