अहिल्यानगर दिनांक 25 ऑगस्ट
पाईपलाईन रोडवरील बहुचर्चित खून प्रकरणाता अटक असलेल्या माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी इतर आरोपींना औरंगाबाद हायकोर्टाचा दणका बसला असून या प्रकरणात आरोपींचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने काही निरिक्षणे नोंदवली आहेत.
या प्रकरणात तब्बल ७९ साक्षीदार आहेत. त्यामुळे माननीय कनिष्ठ न्यायालय या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने चालवावी. जर पुढील सहा महिन्यांत खटल्याच्या कार्यवाहीत भरीव प्रगती झाली नाही, तर जामिनासाठीची विनंती पुन्हा करण्याची मुभा अर्जदाराला देण्यात येऊ शकते,खटल्याचा जलद गतीने निकाल लावण्यासाठी सर्व पक्षांनी सत्र न्यायालयाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केलीय.





