अहिल्यानगर दिनांक ५ सप्टेंबर
गोपाळकाला म्हणजेच दही हंडीचा उत्सव हाऊ तो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बाल गोपाळांपासून अबाल वृध्द, महिला तरुणी,तरुण सर्वच वयोगटातील नागरिक या उत्साहात सामील होत असतात.

काही काळात बसून या दहीहंडीचा सुरेख थोडा बदलत असला तरी गल्लो गल्ली चौका चौकांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो. अहिल्यानगर शहरातील फकीरोडा भागात असेच एक छोटे मंडळ असून गेल्या पंधरा वर्षांपासून हे मंडळ दहीहंडीचा उत्सव साजरा करत आहे यावर्षी दहीहंडी उत्सव असल्यामुळे त्यांनी याकरिता भिंगार पोलीस स्टेशन मध्ये परमवीर साठी अर्ज दिला होता मात्र आम्ही या परिसरात परवानगी देणार नाही असे तोंडी या मंडळाला सांगण्यात आल्यामुळे या मंडळालाही आश्चर्य वाटले आपण भारतात नव्हे तर पाकिस्तानात राहतो का असा आभास त्यांना काही वेळ झाला हिंदू सण साजरे करण्यासाठी पोलिसांची रिचार्ज परवानगी मागत असताना त्या भागात परवानगी का नाही असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांना पडला.
याबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालताच त्यांनी या बाबत पोलिसांशी चर्चा करून परवानगी देण्यासाठी पोलिसांना विनंती केली.
नगर शहरात हिंदू सण साजरा करण्यासाठी परवानगी नाकारणारे भारतातील पहिलेच पोलीस स्टेशन असू शकते. आज पर्यंत या मंडळाबाबत कोणतीही तक्रार नसताना किंवा यापूर्वी दही हंडी उत्साह दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसताना परवानगी का नाकारली हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे भिंगार पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून हिंदू सणांना विरोध का? आणि कोणी केला याबाबत हे चौकशी करावी अशी मागणी समोर येत आहे.
मात्र या उलट या परिसरात अवैध धंद्यांना लवकर परवानगी मिळते अशी ही चर्चा सुरू आहे. भिंगार परिसरात अनेक अवैध धंदे सुरू असून. एसबीआय चौकामध्ये स्पा सेंटर आणि एक मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समजली आहे. मात्र याला परवानगी कोणी दिली आणि ती किती पटकन दिली गेली याच्याही चांगल्या चर्चा घडत आहेत हिंदू सणांना विरोध आणि अवैध धंधांना परवानगी हा कुठला न्याय!





