Homeसांस्कृतिकदिंडी | Way of Life’ ची आंतरराष्ट्रीय टागोर फिल्म अवॉर्ड्ससाठी अधिकृत निवड,...

दिंडी | Way of Life’ ची आंतरराष्ट्रीय टागोर फिल्म अवॉर्ड्ससाठी अधिकृत निवड, भैरवनाथ वाकळे यांच्या पहिल्याच शॉर्ट फिल्मची कलानगरीकडून दखल .

advertisement

अहिल्यानगर
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘DINDI | Way of Life’ या शॉर्टफिल्मची ५ व्या International Tagore Film Awards 2026 साठी अधिकृत निवड झाली आहे. या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे आणि संपूर्ण कलावंत-तंत्रज्ञ टीमला प्रदान करण्यात आले आहे.

कलानगरी कोलकाता येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्यात येतो. ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या 5th International Tagore Film Awards 2026 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘DINDI | Way of Life’ या कलाकृतीची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
या शॉर्टफिल्ममध्ये प्रदर्शित केलेल्या “outstanding artistic vision and cinematic excellence” अर्थात उत्कृष्ट कलात्मक दृष्टी आणि सिनेमॅटिक गुणवत्तेची दखल घेत ज्युरीज् कडून त्याची अधिकृत निवड करण्यात आली आहे.

जगभरातील चित्रपट निर्मात्यांकडून प्राप्त झालेल्या चित्रपटांचे Festival Programming Committee कडून परीक्षण करण्यात आले. त्यानंतर या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे प्रमाणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

ही निवड केवळ चित्रपटासाठीच नव्हे, तर त्यामागे काम करणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ आणि संपूर्ण सर्जनशील टीमसाठी महत्त्वपूर्ण गौरव मानला जात आहे. अहिल्यानगरचे निवेदक किरण डहाळे यांनी आवाजाच्या रुपात आपली जबाबदारी पार पाडली असून नगरच्या कलाकारांनी तयार केलेल्या या शॉर्टफिल्मची आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड होणे ही सर्व नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

भैरवनाथ वाकळे यांच्या पहिल्याच प्रयत्नाला यश –
‘DINDI | Way of Life’ या नावातूनच चित्रपटाचा केंद्रबिंदू आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन अधोरेखित होतो. भारतीय सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या ‘दिंडी’ या संकल्पनेला व्यापक कलात्मक माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न भैरवनाथ वाकळे यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये केला आहे. महापालिकेचे प्रथम विरोधी पक्षनेते पद भूषविलेल्या वाकळे यांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु केली आहे .

‘DINDI | Way of Life’ ची या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी झालेली अधिकृत निवड ही नगरच्या कलाकरांसाठी प्रेरणादायी घटना असून कोलकाता येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महोत्सवात या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमोर आपली कलाकृती मांडण्याची संधी मिळणार आहे. या उल्लेखनीय निवडीबद्दल नगरच्या कलाक्षेत्रातील मान्यवरांनी ‘दिंडी’ टीमचे अभिनंदन केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular