Homeविशेषअहिल्यानगर शहरात 'जागर नारी शक्तीचा' दांडिया नाईटचे भव्य आयोजन; महिला घेणार पर्यावरण...

अहिल्यानगर शहरात ‘जागर नारी शक्तीचा’ दांडिया नाईटचे भव्य आयोजन; महिला घेणार पर्यावरण संवर्धनाची शपथ * उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून भव्य सामाजिक व सांस्कृतिक सोहळा * आ. संग्राम भैय्या जगताप, धनश्रीताई विखे पाटील व भाजप पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती * ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘ग्रीन सिटी’ मोहिमेचा होणार प्रसार

advertisement

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून यंदाच्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून ‘जागर नारी शक्तीचा – दांडिया नाईट २०२६’ (व्हॉल्यूम ८.०) चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता नगर-शिर्डी रस्त्यावरील दत्तात्रय जाधव नगर येथील ‘बंधन लॉन्स अँड रिसॉर्ट’ येथे पार पडणार असून, यामध्ये सांस्कृतिक उत्साहाबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपली जाणार आहे.

‘ग्रीन सिटी’ मोहीम आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ
या कार्यक्रमादरम्यान ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ‘ग्रीन सिटी’ (हरित शहर) या विशेष मोहिमेबद्दल उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन व माहिती दिली जाणार आहे. अहिल्यानगर शहराला अधिक हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी उपस्थित सर्व महिलांना पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ दिली जाईल. या विशेष सोहळ्यास आमदार संग्राम भैय्या जगताप, ‘रणरागिणी मंडळा’च्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिलांसाठी मोफत प्रवेश, आकर्षक सोयी आणि भव्य पारितोषिके
महिलांसाठी पूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या दांडिया नाईटमध्ये आकर्षक डान्स फ्लोअर, उत्कृष्ट गरबा परफॉर्मन्स आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय गरब्यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या व सजलेल्या महिलांसाठी ‘बेस्ट ग्रुप’, ‘बेस्ट दांडिया क्वीन’ आणि ‘बेस्ट कॉस्ट्युम’ अशी आकर्षक पारितोषिके देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
सोमनाथ जाधव, दिनेश फिरके व सहकाऱ्यांच्या संयोजनाखाली पार पडणाऱ्या या भव्य सोहळ्यास अहिल्यानगर शहरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular