HomeUncategorizedगोविंदपुरा मनपाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा डाव ?

गोविंदपुरा मनपाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा डाव ?

advertisement

अहमदनगर दि.४ जून
महानगर पालिकेच्या खुल्या भूखंडावर काही लोक अतिक्रमण करून लोखंडी पत्रे ठोकून मोकळी जागा बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनवर कारवाई करावी असे निवेदन गोविंदपुरा, फकीरवाडा भागातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मुकुंदनागर आणि फकिरवाडा शेजारी असणाऱ्या गोविंदपुरा भागात महानगर पालिकेच्या मालकीच्या जागे मध्ये मधील मोकळा जागा (Open space) आहे.ही जागा काही खाजगी लोक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असून रविवारी दुपारी काही लोकांनी या ओपन स्पेस वर पत्रे ठोकून फकीरवाडा ,गोविंदपुरा या भागातील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद केला असल्यामुळे नागरिकांनी भिंगार पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार केली होती.

भिंगार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली तसेच जे लोक अतिक्रमण करत आहेत त्यांच्याकडे महापालिके बरोबर करार केल्याप्रमाणे काही कागदपत्र आहेत का याबाबत चौकशी केली. काही लोकांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेने ठराव करून हा मुक्काम भूखंड आम्हाला दिला असल्याचं सांगितले आहे. मात्र त्याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन सोमवारी सकाळी पोलीस ठाण्याला संबंधित नागरिकांना बोलवले असून या ठिकाणी राहणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की ही जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने अनेक भूखंड माफियांचा डोळा सदर जागेवर असून सदर जागा बळकावण्याचा उद्देशाने अतिक्रमण सुरू आहे।.या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular