Homeशहरकोविड सेंटर गौडबंगाल तपास जैसे थे ... मनपा प्रशासन पोलिसांना माहिती देईना...

कोविड सेंटर गौडबंगाल तपास जैसे थे … मनपा प्रशासन पोलिसांना माहिती देईना तपास पुढे सरकाना.

advertisement

अहमदनगर दिनांक 30 नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील कोविड सेंटर बाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संदीप भांबरकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर याबाबत कोतवाली पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मात्र ही चौकशी सध्या जैसे थे परिस्थितीत असून या चौकशीची गाडी पुढे सरकताना दिसत नाही. कारण या चौकशीसाठी महत्त्वाचा भाग म्हणजे अहमदनगर महानगरपालिकेत कडून पाहिजे असलेली माहिती यावरच पुढील सर्व कारवाई अवलंबून असल्याने तपासी अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे दोन वेळेस पत्र व्यवहार करूनही अद्यापही पोलिसांनी मागितलेली माहिती मिळालेली नाही त्यामुळे हा तपास थंडवलेला दिसतोय.

नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबारकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यानंतर या कोविड सेंटरमध्ये मोठे गोडबोंगल असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व निकष पायदळी तुडवून कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली आहे.तसेच अनेक त्रुटी त्यांनी आपल्या अर्जाद्वारे निदर्शनास आणून दिल्या असल्यामुळे पोलिसांना आता महानगरपालिकेकडून माहिती मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करणे शक्य होईल.

यादरम्यान शहरातील डॉक्टरांच्या संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन विनाकारण आरोप होत असल्यास सांगितले होते. मात्र कर नाही त्याला डर कशाला अशी भावना आता सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. जर यामध्ये डॉक्टर दोषी नसतील मात्र जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. महानगरपालिका पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ का करते हा एक प्रश्न अनुत्तरीत राहणारा आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular