Homeशहरवार्ड क्रमांक 1 मधील लेखानगर येथे बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ ...

वार्ड क्रमांक 1 मधील लेखानगर येथे बंद पाईप गटर कामाचा शुभारंभ लेखानगर परिसरातील विकास कामांचे दिलेले शब्द पूर्ण केले : विरोधी पक्षनेता संपत बारस्कर

advertisement

अहमदनगर दि.१ डिसेंबर :
प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनी मला विकासाच्या मुद्द्यावर दोनदा निवडून दिले आहे यावेळी लेखानगर मधील नागरिकांना विकासाचे दिलेले शब्द पूर्ण केले याचा आनंद आहे आज होते आहे प्रभाग 1 हा नव्याने विकसित होणारे उपनगर आहे. मूलभूत प्रश्नांपासून कामे करावी लागत आहे नव्याने नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाची कामे मार्गी लावली जात असल्यामुळे प्रभागात विकासकामे दिसू लागली आहे पुढील काळातही प्रभाग विकासाच्या दिशेने वाटचाल करीत राहील लेखानगर येथील अनेक वर्षाचा प्रलंबित ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी चा मार्गी लावला आहे आता रस्त्यांचे कामही सुरू होतील असे प्रतिपादन मनपा विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर यांनी केले.
       वार्ड क्रमांक 1 मधील लेखानगर येथे बंद पाईप कामाचा शुभारंभ ह.भ.प. संदीप महाराज खोसे यांच्या हस्ते संपन्न झाले समवेत मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, गाडे काका, सुनील डोंगरे, सतीश जगताप, संदीप टकले, सचिन बदरगे, रामकिसन सुपेकर, काजळे मेजर, अनिल शिरसागर, शोभा जगताप, शितल अंतरे, कल्पना भदरगे अनिता काळे,सौ सांगळे, सरला डोंगरे, संत ज्ञानेश्वर माऊली सेवा समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणाले की प्रभागाच्या विकास कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही नागरिकांच्या सूचनेनुसार सुचवलेल्या विकास कामांना प्राधान्य दिले जाते प्रभागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे भिस्तबाग चौक ते महालापर्यंतचे रस्ताचे काम पूर्ण झाले आहे आमदार संग्राम जगताप व मनपा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी पुढाकार घेऊन सावेडी उपनगरातील अत्यंत महत्त्वाचा कचरा डेपो हालून हा प्रश्न देखील मार्गी लावला तपोवन रस्त्याचे कामही मार्गी लावले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular