Home शहर महानगर पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण त्या म.नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल…

महानगर पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण त्या म.नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल…

..अहमदनगर दि.२६ नोव्हेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रमाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शेख मुददसर इसाक अहमद आणि एका पियागो रिक्षा चालकाविरुद्ध भिंगार पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोठला स्टॅन्ड परिसरात मध्ये महानगरपालिकेचे प्रभारी स्वच्छता निरिक्षक राजेश प्रकाश तावरे हे काम करत असताना त्या ठिकाणी येऊन माजी नगरसेवक शेख मुददसर इसाक अहमद आणि पॅगो रिक्षा एम एच 16 एड 5268वरील चालक यांनी राजेश तावरे यांच्याबरोबर शाब्दिक बाचाबाची केली आणि त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद राजेश तावरे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून माजी नगरसेवकासह पॅगो रिक्षा चालकावर भादविक 353,143,323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करत आहेत.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version