Home Uncategorized ५ लाखाच्या खंडणी,डांबून ठेवणे,मारहाण, प्रकरणी एका महिला पत्रकारासह ६ बोगस पत्रकारांवर खंडणीचा...

५ लाखाच्या खंडणी,डांबून ठेवणे,मारहाण, प्रकरणी एका महिला पत्रकारासह ६ बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे – दि.२६ ऑक्टोबर

पत्रकार असल्याचा कांगवा करून अनेक बोगस लोक सध्या पत्रकारितेला बदनाम करत आहेत याप्रकरणी अशा अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र तरीही बोगस पत्रकारांचे सर्वसामान्य लोकांसह व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून लुटण्याचा धंदा काही बंद होताना दिसत नाही असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यात समोर आला असून तेजाराम भिमाजी देवासी,(वय ४२ वर्षे धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं. ३०५,सुरेख हाईट्स, लोणकर वस्ती चौक, केशवनगर-मांजरी रोड, केशवनगर,मुंढवा पुणे मुळ रा. मु.पो. गुडाजाठान, ता. देसुरी, जि. पाली. राज्य राज्यस्थान,) यांच्या फिर्यादी वरून पाच लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ गुन्हयाची हकिकत अशी की  यातील फिर्यादी यांना  दि. २३/१०/२०२२ रोजी सायंकाळी ०६ वा. ते रात्री ०९/३० वा. दरम्यान दत्तकॉलनी, लोणकर वस्ती चौक, केशवनगर- मांजरी रोड, केशवनगर, मुंढवा, पुणे येथील गोडाऊन मध्ये इसम नाम प्रमोद साळुंके, वाजीद सय्यद व गोडाऊनच्या बाहेर मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर असे मिळुन येवून प्रमोद साळुंखे याने टाईम्स ऑफ इडीया व आत्मज्योती या पेपरचा पत्रकार असल्याचे सांगुन आमचे गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करून, दोन नंबरचा धंदा करता यापूर्वी गुटख्याची विक्री करून खुप पैसा कमावला आहे. आता पेपरमध्ये बातमी लावुन, बदनामी करून, पुर्णपणे बरबाद करून टाकतो. जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खुन करून टाकतो. अशी धमकी देवून माझ्या मुलाला हाताने मारहाण करुन, पत्नीला
व मुलाला गोडाऊनमधुन बाहेर पडण्यास अटकाव करून, प्रमोद साळुंखे वाजीद सय्यद यांनी स्वतःसाठी व त्यांचे साथीदार मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तंवर व आत्मज्योती पेपरचे संपादक संजिवनी कदम मॅडम यांच्यासाठी माझ्याकडून जबरदस्तीने ०५ लाख रुपये खंडणी घेवुन गेले आहेत.

या प्रकारची फिर्याद मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात अली असून १) प्रमोद साळुंखे २) वाजीद सय्यद ३) मंगेश तांबे ४) योगेश नागपुरे ५) लक्ष्मणसिंग तंवर ६) संजिवनी कदम सर्व राहणार पुणे यांच्या विरोधात भा.दं. वि. कलम ३८४. ३८७ ३४१, ४५२ ५०६, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास मुंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करपे हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version