अहमदनगर दि.२३ सप्टेंबर
अहमदनगर शहरात वर्गणी वरून चांगलाच गोंधळ सुरू असून नुकताच झालेल्या गणपती उत्सवाच्या दरम्यान वर्गणी दिली नाही म्हणून बाजारपेठेतील काही लोकांना सध्या त्रास दिला जात आहे त्यांच्या कुलपांमध्ये रात्रीच्या वेळेस कुलूप खराब होईल अशी द्रव्य पदार्थ टाकले जात आहेत. तसेच धमक्याही दिल्या जात आहेत याबाबत नुकतीच काही व्यापाऱ्यांनी एक बैठक घेतली असल्याची माहिती हाती येत आहे. या बैठकीत या टवाळखोरां विरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलिसांकडे जाण्याचा निर्णय झाला आहे.
तर अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून दिल्लीगेट भागातील एका चहाच्या टपरीवाला नवरात्रीची वर्गणी मागण्यावरून शिवीगाळ व वर्गणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत कळू श्रीराम यांनी पोलीस ठाण्यात वर्गणी न दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली असून या प्रकरणी सुमित आणि कैलास यांच्या विरुद्ध 323,504,506 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.