अहमदनगर दि.१४ नोहेंबर
एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अटक करण्यात लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाला यश आले आहे. बारा दिवसांपासून शोधावर असलेल्या पथकाला गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात यश आले. वाघ याला दुपारी जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या नायायल्यात हजर करण्यात आले न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची १९ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.