अहमदनगर दि.१६ नोव्हेंबर
अहमदनगर मधील चौंडी येथे आज चांगलेच राजकीय फटाके फुटले भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या निवास्थानी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यांच्या घरा शेजारीच आमदार रोहित पवार यांनी विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची आज चांगलीच चंगळ झाली असून अनेकांनी या संधीचा फायदा घेतला.