Home शहर जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती पंधरवाडा उत्साहात साजरा विविध उवक्रम राबवून करण्यात आली व्यसनमुक्तीची...

जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती पंधरवाडा उत्साहात साजरा विविध उवक्रम राबवून करण्यात आली व्यसनमुक्तीची जनजागृती

अहमदनगर दि.५ ऑगस्ट
जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयात व्यसनमुक्ती पंधरवाडा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय यामध्ये व्यसनमुक्ती व मानसोपचार या विषयावर जनजागृती पर समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सब्जेल अहमदनगर विसापूर जेल मानव सेवा प्रकल्प आरंगाव स्नेहालय अहमदनगर येथील लाभार्थी यांच्यासाठी देखील व्यसनमुक्तीपर समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दिनांक 2 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयात नरसिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली तसेच व्यसनमुक्ती या विषयावर रांगोळी स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर केले या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वसंत जमदाडे मानसोपचार तज्ञ डॉक्टर अशोक कराळे मानसोपचार तज्ञ डॉक्टर तेजस्विनी मिस्कीन मेट्रल  जाधव मॅडम नर्सिंग विद्यालयाचे प्राचार्य श्री खटके सर तसेच विद्यार्थिनी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.


सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालयाचे  मीनल कटकोळ, गोरक्ष इंगोले, विवेक मगर अनिकेत केदारी  स्नेहल पिसका आणि श्रीमती पौर्णिमा आंबेकर यांनी विशेष सहकार्य केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष इंगोले यांनी पार पाडले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version