Homeशहरवकील होण्याआधीच न्यायालयाच्या आवारात दोन तरुणांनी केले हे कृत्य...

वकील होण्याआधीच न्यायालयाच्या आवारात दोन तरुणांनी केले हे कृत्य…

advertisement

अहमदनगर दिनांक 24 जुलै
अहमदनगर शहरातील जिल्हा न्यायालयात दोन प्रशिक्षणार्थी तरुण वकिलांमध्ये बाचाबाची होऊन दोघांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडल्याची चर्चा असून यामध्ये एका तरुण वकिलावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मंगळवारी सायंकाळी न्यायालयाचे कामकाज संपत आल्यानंतर न्यायालयात असलेल्या कॅन्टीन जवळच दोन तरुण वकील एकमेकांसमोर आले आणि मागील काही रागातून त्यांची बाचा बाची होऊन हाणामारी झाल्याची घटना घडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू असून यामध्ये एका तरुण वकिलाला जास्त मार लागल्याने त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कॉलेजमधील भांडणे थेट न्यायालयात आले असून दोन्हीही तरुण हे प्रशिक्षणार्थी वकील असून वकील होण्याआधीच न्यायालयाच्या आवारातच दोघांनी एकमेकांची गचंडी पकडल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

या प्रकाराची न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांना कल्पनाच नसल्याने सायंकाळी अनेकांनी फोना फोनी करून विचारणा केली होती. मात्र असे प्रकार न्यायालयात घडू नये यासाठी नवीन होत असलेल्या वकिलांनी न्यायालयाच्या नियमांची माहिती घेऊन पालन करावे अशी अपेक्षा ज्येष्ठ वकिलांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular