अहमदनगर दिनांक 24 जुलै
119 वर्षांची परंपरा असलेली नगर शहरातील नगर अर्बन बँक बोगस कर्ज वाटप झाल्यामुळे आणि त्याची वसुली न झाल्याने अनेक घोटाळे झाल्यामुळे बंद पडले आहे मात्र या बिकट परिस्थितीमध्ये ही बँक वाचवण्याची धडपड बँक बचाव समिती करत आहे न्यायालयीन लढा बरोबर आता कर्ज वसुलीसाठीही ठेवीदारांसह बँक बचाव समितीने पाठपुरावा केल्यामुळे सध्या बँकेमध्ये असलेले आवसायक गणेश गायकवाड यांच्या आदेशाने आता कर्ज वसुली सुरू झाले आहे.
नगर अर्बन बँकेत झालेला कर्ज प्रकरण घोटाळा प्रकरणी आता अनेक संचालक जेलची हवा खात आहेत तर अनेक संचालक फरार झालेले आहेत त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पैसे न भरणारे थकबाकीदार आता बँकेने घेतलेल्या कटर भूमिकेमुळे पैसे भरण्यास तयार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अर्बन बँकेचे कर्मचारी सध्या स्थितीत कर्जदारांच्या घरांसमोर जाऊन ढोल ताशा सह कर्ज वसुलीसाठी धडकत असल्यामुळे अनेकांनी याची जास्ती घेतले आहे अनेक कर्जदार आता बँकेतून पैसे भरण्याची तयारी दाखवत आहे.
डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि त्यावर नगर अर्बन बँक वसुली पथक असे लीहलेल्या टोप्या घालून सध्या नगर अर्बन बँकेचे वसुली पथक कर्जदारांच्या दारात धडकत आहेत तसेच ढोल ताशांचा आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांनाही ही गोष्ट कळत असल्याने आता थकीत कर्जदार स्वतःहून बँकेमध्ये धाव घेतानाचे चित्र पाहायला मिळतेय.
जा कर्जदाराची कुवत नाही अशा कर्जदारालाही नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह संचालक मंडळाने कर्ज दिल्यामुळे कर्जदार एक पैसाही भरू शकत नाही मात्र त्यांच्या नावाचे कर्ज दुसऱ्याच कोणत्यातरी संचालकाच्या खात्यात वर्ग झाल्याची बाब फॉरेन्सिक ऑडिटमध्ये नमूद झालेली आहे. असे संचालक आणि काही ठराविक कर्जदार सध्या फरार आहेत.काही कर्जदार नगर शहरात असूनही अटकेच्या भीतीपोटी भूमिगत झालेले आहेत. मात्र सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे अशा कर्जदारांचा पोलिसांनी शोध घेऊन अटक करावी. तर अनेक व्हाईट कॉलर कर्जदार आम्हाला अटकच होऊ शकत नाही अशा वल्गना करत आहेत. त्यामुळे गोरगरिबांचे पैसे घेऊन मौज मजा करणाऱ्या अशा थकीत कर्जदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कर्जाची सक्त वसुली करावी अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे तसेच थकित कर्जदारांच्या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवेदारांचे पैसे द्यावे आणि बँक पुन्हा सुरू करावी अशी मागणी ही बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी केली आहे.