Home Uncategorized पारनेर नंतर नेवासे तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात गरिबांच्या धान्यावर डल्ला दिवाळीच्या सणात...

पारनेर नंतर नेवासे तालुक्यात स्वस्त धान्य दुकानात गरिबांच्या धान्यावर डल्ला दिवाळीच्या सणात गरिबांच्या तोंडातील अण्णा हिसकावून खणाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर दि.२२ऑक्टोबर

चार दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील बाभुळवाड्याच्या स्वस्तधान्य दुकानदाराच्या विरोधात लाभार्थ्यांचे धान्य काळ्या बाजारात परस्पर विक्री प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नायब तहसीलदार सुभाष बाबुराव कदम यांनी या बाबत फिर्याद दिली असून पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील स्वस्त धान्य दुकानदार शिवाजी दगडू जगदाळे यांनी लाभार्थ्यांना धान्य वितरण किंवा साखरेची वाटप न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे प्रकरण ताजे असतानाच नेवासे तालुक्यातही असाच प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलाय.

नेवासा तालुक्यात रेशनिंगचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे भानसहिवरे गावात गोडाऊन आहे. याच गोडाऊन मध्ये अवैधरित्या गहू आणि तांदूळ साठवून ठेवला होता. याची माहिती काही स्थानिक ग्रामस्थांना मिळाली होती ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन गाडीमध्ये भरून जाणारे सुमारे १५७ तांदळाचे कट्टे पकडले. नंतर गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला गहू आणि तांदूळ त्यांना सापडला.

ऐन दिवाळीमध्ये एवढा मोठा रेशनचा साठा हा काळा बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता. मात्र ग्रामस्थांनी हा माल पकडतात पुरवठा दराने त्या ठिकाणी काही गुंडांना पाठवून माल पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना मारहाण केली आहे.या मारहाणीमुळे काही ग्रामस्थ जखमी झाले असून त्यांना नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बाबत तहसीलदार सुरेशकुमार सुराणा यांना माहिती भेटल्या नंतर त्यांनी  पुरवठा अधिकारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कारवाई सुरू होती मात्र माल कोणाचा आहे याबाबत माहिती प्रशासनाने दिली नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version