:अहमदनगर जिल्ह्याचे (ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashlok Ahilya Devi Nagar) करावे अशी मागणी सुरवातीला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली होती. त्यांनतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(एक यांनी अहमदनगरचे नाव लवकरच अहिल्यानगर करणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर राज्य सरकारने तसा ठराव करून केंद्र शासनाकडे पाठवला होता आणि आता केंद्र शासनाने ही अहमदनगर चे नाव अहिल्यानगर करण्याबाबत ठराव पास केला आहे.
अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली होती अहमदनगर शहराच्या स्थापनेला जवळपास 536 वर्ष पूर्ण झाले आहेत.मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasheb thakre)यांची 1995 साली वाडिया पार्क येथे झालेल्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव आजपासून ‘अंबिकानगर’ झाले असे जाहीर केले होते. तेंव्हापासूनच शिवसेनेने ही मागणी लावून धरली होती. शहरातील विशाल गणपती मंदिरात मिळालेल्या कागदपत्रात शहराचे नाव ‘तळीये नगर’ असं असल्याची नोंद सापडते. अहमदनगरचे नाव हे ‘अंबिकानगर’ व्हावे ही मागणी मनसेने देखील केली होती. नगर शहरात रेणुका मातेचे मंदिर आहे, रेणुका माता अर्थात अंबिका मातेवरून शहराचे नाव असावे या मागणीसाठी मनसेने मोठे आंदोलन केले होते.
तर 15 मे 2017 साली काही हिंदुत्ववादी संघटना आणि तत्कालीन शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि नगरसेवक योगीराज गाडे यांनीही अहमदनगर शहराचे नाव श्रीराम नगर करावे अशी मागणी केली होती मात्र कालांतराने ही मागणी मागे पडली.
आज नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने आता काही दिवसातच सर्व सरकारी सोपस्कार पार पडून अहमदनगर शहराचे नाव बदलले जाणार आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर केले असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील प्रश्न लगेच सुटणार का? अहमदनगर शहराचे नाव बदलल्याने शंघाय होणार का? अशी टीका आता सोशल मीडियावर सुरू झाल्या असून नाव बदलण्यापेक्षा विकास करा अशी अपेक्षा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी करत आहेत.