Homeसांस्कृतिकबंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेजच्या वतीने भव्य दांडियाचं आयोजन; भरपूर बक्षीसे...

बंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेजच्या वतीने भव्य दांडियाचं आयोजन; भरपूर बक्षीसे आणि निशुल्क प्रवेश…

advertisement

अहमदनगर दिनांक 3 ऑक्टोबर Navratri 2024 :नवरात्रीत भव्य दुर्गापूजेचं आयोजन करण्याबरोबरच गरबा आणि दांडिया (Dandiya) खेळण्याचाही ट्रेंड आहे. विशेषत: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये गरबा आणि दांडिया नृत्य गुजरातच्या रस्त्यांवर तसंच इतरत्र देखील सर्रास पाहायला मिळतं. मात्र आता महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दांडिया आयोजित करण्यात येत आहे. अहमदनगर शहरातही यावर्षी ठीक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून बंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेजच्या वतीने भव्य बॉलिवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी महिलांसाठी मोफत प्रवेश सोबत लकी ड्रॉ आणि भव्य बक्षिसांची मेजवानी असून येणाऱ्या महिलांसाठी भव्य डान्स फ्लोर, फूड स्टॉल असून त्याचबरोबर दांडिया मध्ये सहभाग घेणाऱ्या महिलांसाठी बेस्ट ग्रुप,बेस्ट दांडिया क्वीन ,बेस्ट कॉस्ट्यूम अशा अनेक बक्षिसांची लयलूट होणार आहे.

5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून या दांडिया सुरू होणार असून यासाठी व्हीआयपी पास मिळवण्यासाठी हॉटेल नगरी व्हिलेज बंधन लॉन्स जवळ आणि क्रिएटर्स डान्स अकॅडमी & ड्रेपरी, दिल्लीगेट या ठिकाणी इच्छुक महिला भगिनींनी संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले आहे.

दांडियाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावं, असं आवाहन धनंजय जाधव यांनी केलय.हिंदू संस्कृती जपणाऱ्या प्रत्येकाला या दांडियासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे . उत्साहाच्या वातावरणात दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटके संयोजन असलेल्या या दांडियाची रंगत सर्वांना आवडेल. दांडियाच्या ठेक्यावर धमाल करण्यासाठी आणि बक्षिसे जिंकण्यासाठी सर्वांनी यावं असे आवाहनही धनंजय जाधव यांनी केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular