Home शहर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक शहरात उभारणार :आमदार संग्राम जगताप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक शहरात उभारणार :आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर दिनांक एक एप्रिल

हिंदुस्थानच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभर अनेक समाजभिमुख कार्य केले आहे हिंदू धर्मासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूजनीय असून त्यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यात झाल्यामुळे त्यांच्या प्रति आपण अपार श्रद्धा ठेवणे क्रमप्राप्त आहे .हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष असून यावर्षी राज्य शासनाच्या वतीने शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे उभारण्यात येईल ,असे राज्य शासनाच्या वतीने मी जाहीर करतो असे गौरव उद्गार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.धनगर समाज वधु वर मेळावा धनगर सेवा संघाच्या वधू-वर मेळाव्यात आमदार जगताप बोलत होते.


धनगर समाज सेवा संघ अहमदनगरच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे सोमवार दिनांक 31 मार्च रोजी गंगा लॉन्स, निर्मलनगर, अहमदनगर येथे पार पडलायावेळी आ.संग्राम जगताप बोलत होते.या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले, नगरसेवक निखिल वारे,कुलगुरू भानुदास कुचेकर,नगरसेविका कलावती शेळके, शारदा ढवण, अध्यक्ष राजेंद्र तागड, सचिव सूर्यकांत तागड, खजिनदार निशांत दातीर,चेअरमन दत्तात्रय गावडे,अशोक राशीनकर, , उत्तम सरगर , अनिल ढवण काका शेळके, विनोद पाचारणे, सोपान शिकारे अक्षय वाघमोडे,सुदाम तागड , धोंडीभाऊ दातीर , विनायक नजन, भाऊसाहेब तोगे , तुकाराम मिसाळ, सौ.पार्वती तागड, सौ.शोभा दातीर,मोहन सरोदे , अक्षय भांड,वसंतराव दातीर, दशरथ लांडगे, इंजि.राजेंद्र पाचे,ज्ञानेश्वर घोडके, विजय शिपणकर, डॉ. नामदेव पंडित, मयुर राहिंज , गोवर्धन सरोदे, आण्णासाहेब बाचकर, इंजि.डी.आर.शेंडगे,राजेंद्र नजन, संतोष गावडे आदी उपस्थित होते.

या वधू-वर मेळाव्यात जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातीलही वधू-वर, पालक उपस्थित होते.यावेळी वधू वर नोंदणी पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तसेच वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या समाजातील मान्यवरांचाही गौरव करण्यात आला.

पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या त्या काळातील तुळजाभवानीच्या अवतार असाव्यात असा माझा विश्वास असून अत्यंत कठीण प्रसंगातही त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या जिल्ह्यातील या महिलेने इंदोर येथे होळकरांचा गादीचा वारसा अत्यंत नेटाने सांभाळला. या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आगरी होतो तसेच या नामांतरासाठी राज्य सरकारने घेतलेली भूमिका अनेक पिढ्या लक्षात ठेवीन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जिल्ह्यातील सामान्य जनतेलाही समजला पाहिजे याकरिता शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून याकरिता पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेतला असून मी स्वतः या कामासाठी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच एमआयटी कॉलेजचे कुलगुरू भानुदास कुचेकर इंजी . डी आर.शेंडगे आदींनी आदींची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले.प्रास्ताविक राजेंद्र तागड यांनी केले तर आभार इंजि.राजेंद पाचे यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यातील अनेक भागातून समाजबांधव उपस्थित होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version