HomeUncategorizedभावी खासदारांकडून नगरच्या जनतेची एकच मागणी..कपडबजार, चितळे रोड,चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी...

भावी खासदारांकडून नगरच्या जनतेची एकच मागणी..कपडबजार, चितळे रोड,चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, एकविरा चौक, भिस्तबाग चौक, अशा आणि इतर ठिकाणी चालण्यासाठी उड्डाणपूल बांधा…

advertisement

अहमदनगर दिनांक 28 एप्रिल
अहमदनगर शहर आणि अतिक्रमण हे नातं एकदम घट्ट झाले आहे. अहमदनगर शहरातील अनेक मोठमोठे चौक अतिक्रमण झाल्यामुळे अत्यंत निमुळते झाले आहेत.या ठिकाणाहून पायी आणि दुचाकी चार चाकी घेऊन चालताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावे लागते कारण कधी कोणाला धक्का लागला तर त्यातून होणारी वादावादी आणि गाडीचे नुकसान हे टाळण्यासाठी नागरिकांना अत्यंत संथगतीने मार्गक्रमण करावे लागते.

नगर शहरातील चितळे हा रोड फक्त नावाला आहे या रोडवर दोन्ही बाजूंनी मोठमोठे व्यापाऱ्यांची अतिक्रमणे त्यानंतर पुढे भाजी आणि इतर साहित्य विकणारे लोक त्यानंतर होणारी पार्किंग आणि मग उरला तर रस्ता तर चौपटीकरांजा चौकात रस्त्याच उरत नाही लोकांना रस्ता शोधून या ठिकाणी मार्गक्रमण करावे लागते कारण या ठिकाणी उभ्या असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या त्यानंतर खाद्यपदार्थ खाण्यासाठी उभे राहणारे लोक आणि त्यापुढे होणारी पार्किंग आणि तिथून पुढे उरला तर रस्ता अशी परिस्थिती चौपटी कारंजा आणि दिल्ली गेट परिसरामध्ये असते. त्याचप्रमाणे प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी असलेल्या चौपटीची हीच परिस्थिती आहे संध्याकाळी या ठिकाणी चालण्यासाठी रस्ता शोधावा लागतो मोठमोठे दुकाने असूनही त्यापुढे अतिक्रमण करून मोठ-मोठे शेड टाकण्यात आले आहेत त्या शेडमध्ये आलेल्या ग्राहकांना बसवण्यात येते ग्राहकांच्या दुचाकी चार चाकी या रोडवर पार्किंग केल्या जातात त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो तर दुकानदारांची अरेरावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची अरेरावी यामुळे येथे रोज वादाचे प्रसंग घडतात.

हीच परिस्थिती सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक एकविरा चौक आणि पाईपलाईन रोडवरील संपूर्ण परिसरात आहे. लाखो करोडोंची दुकाने असताना अनेक दुकानदार रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करतात त्यामुळे वाहनांची होणारी वाहतूक कोंडी आणि उन्हाळा त्रासाकडे कोणीच लक्ष देत नाही.

नगर शहरातील कापड बाजार ,गंज बाजार, सराफ बाजार या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे मोठ-मोठे दुकाने आत ठेवून रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करण्याचा फंडा जणू नगर शहरात सुरू आहे. रस्ता आपल्या नावावर असल्याप्रमाणे अनेक व्यावसायिक रस्त्यावरच व्यवसाय करताना दिसतात महानगरपालिका कधीमधी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवते मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही कारवाई काही काळापूर्तीच असते मात्र सध्या आचारसंहिता सुरू आहे प्रशासनावर कोणाचाही दबाव नसल्याने महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम तीव्र करून अतिक्रमण काढावेत आणि रस्त्यांचा श्वास मोकळा करावा अशी मागणी आता सामान्य नागरिक करू लागले आहेत.
तर काही नागरिक गंमत म्हणून नगर शहरातील छोट्या छोट्या रोडवर उड्डाणपूल बांधावे अशी मागणी भाविक खासदारांकडून करत आहेत की जेणेकरून व्यावसायिक आपला व्यवसाय रस्त्यावर करतील करतील आणि जनता उड्डाण पुलावरून ये जा करेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular