HomeUncategorizedमनपा नगर रचना विभागाला ओढे नाले दिसतच नाही.. नैसर्गिक ओढ्यानाल्यांवर मनपा नगररचना...

मनपा नगर रचना विभागाला ओढे नाले दिसतच नाही.. नैसर्गिक ओढ्यानाल्यांवर मनपा नगररचना विभाग देत आहे प्लॉटिंगला परवानगी…..

advertisement

अहमदनगर दिनांक 29 एप्रिल
अहमदनगर शहरातील जुने नैसर्गिक ओढे नाले बुजवून त्यावर मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये आणि तळघरात असलेल्या दुकानांमध्ये साचून नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. सावेडी उपनगरामधील नरहरी नगर परिसरातील नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे या भागात दर पावसाळ्यात नागरिकांच्या घरातून पाणी वाहताना चित्र पाहायला मिळते. याबाबत महानगरपालिका दरबारी तक्रार करूनही अद्यापही नैसर्गिक ओढे नाले बुजवणाऱ्या लोकांवर कारवाई झालेली नाही किंवा पक्की घरे पाडली गेलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. असे असतानाच पुन्हा नरहरी नगर परिसरातील एक नैसर्गिक नाला बुजून सिमेंट नळ्या टाकून त्यावर बांधकाम करण्याचं काम सुरू होत विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने या नैसर्गिक ओढे नाल्यांवर असलेल्या प्लॉटला बांधकामाची परवानगी दिली हे विशेष.ओढे नाले हे निसर्गाने आणि नैसर्गिक पद्धतीने झालेले आहेत मात्र त्यावर होणारे प्लॉटिंग लेआउट हे नागरिक करत असतात आणि याला परवानगी महानगरपालिकेतील नगर रचना विभाग देत असतो मग महानगरपालिकेला असा प्रश्न आहे की नैसर्गिक ओढे नाले आधी की माणसाने बनवलेले लेआउट आधी याचा विचार न करता नगररचना विभाग सर्रास डोळे झाकून नैसर्गिक ओढे नाले बुजून त्यावर बांधकामाची परवानगी देतेच कशी?

अनेक बिल्डर नैसर्गिक ओढे नाले बुजून त्यावर प्लॉटिंग करतात आणि ते विकतात विकत घेणाऱ्याला माहित नसते की प्लॉट नेमका कशा पद्धतीने या ठिकाणी बसवण्यात आला आहे. मात्र जेव्हा नैसर्गिक ओढे नाल्यांचा प्रश्न त्याच्या समोर येतो तेव्हा लाखो करोड रुपये घालून घेतलेल्या प्लॉटवर जर बांधकाम करता येत नसेल तर त्या प्लॉट धारकाची शुद्ध फसवणूक झालेली असते याला जबाबदार लेआउट बनवणारे बिल्डर आणि या बिल्डरांच्या दबावाखाली डोळे झाकून नैसर्गिक ओढे नाल्यांवर बांधकामाची परवानगी देणारा नगररचना विभाग आहे.

सध्या अनेक ठिकाणी नवीन प्लॉटिंग सुरू आहे मात्र नगररचना विभागात वातानुकूलित कार्यालयात बसून अधिकारी कागदावर लेआउटला परवानगी देत असल्यामुळे नैसर्गिक ओढे नाल्यांवरच या परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे पुढील पिढीचे नुकसान आणि मागील जुन्या घरांचे नुकसान किती होणार याकडे मात्र हे अधिकारी लक्ष देत नाहीत.

नरहरी नगर मधील हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी बांधकाम करण्यास विरोध केला आहे मात्र डोळ्याने दिसत असलेला ओढा आणि त्यामध्ये टाकलेले पाईप हे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाला दिसले कसे नाहीत हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular