अहमदनगर दि.२१ जुलै:-
अहमदनगर शहराचा सांस्कृतिक वारसा वृद्धींगत होण्यासाठी जिल्हा वाचनालयाचे योगदान महत्वाचे आहे. सावेडी वाचनालयाच्या नियोजित वास्तूमुळे शहराच्या वाचन संस्कृती मद्ये अधिकाधिक विकसित होण्यास हातभार लागेल असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी येथील नियोजित इमारतीचे भूमीपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सावेडी जॉगिंग ट्रॅक शेजारी झाले त्यावेळीते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा. माणिकराव विधाते, उदय कराळे, मनोज दुलंम, संचालक ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, राहुल तांबोळी, डॉ. शैलेंद्र पाटणकर, किरण आगरवाल, प्रा. मेधाताई काळे,
गणेश अष्टेकर, चंद्रकांत पालवे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की वाचनामुळे माणूस प्रगल्भ होण्यास मदत होते. सार्वजनिक वाचनालय ही काळाची गरज असून वाचनालयांमुळेच शहराची ओळख खऱ्या अर्थाने निर्माण होते. तर प्रास्ताविकात प्रा.मोडक यांनी ज्या शहरातील वाचनालय समृद्ध असतात ते शहर सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत समजले जाते त्या दृष्टीने सावेडी वाचनालयाच्या कामाला आज सुरुवात होत आहे. याचा वाचनालयाच्या सर्व विश्वस्तांना आनंद होत आहे. तसेच धनेश बोगवत यांनी मनोगत व्यक्त करताना या वाचनालयासाठी आर्थिक मदत गोळा करण्याची ग्वाही दिली तर सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले व आभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले. यावेळी सुमितलाल कोठारी, जयंत येलूलकर, आशा मिस्कीन, किशोर मरकड, प्रसाद डोके, मनोज पारखे, सर्वोत्तम क्षीरसागर, आर.जे.कुलकर्णी, विभाकर मोडक, पागिरे, भीमराव काकड, राहुल जाधव, गणेश अदमाने, प्रशांत धडगे आदी मान्यवर उपस्थित होते. वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवी कुकडवाल, वर्षा जोशी, पुनम गायकवाड, मनाली नागुल ,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.