Home Uncategorized कोण कोणाला कुठं नेतोय नगरच्या राजकारणातील दोन दिग्गजांचा हा फोटो चांगलाच होतोय...

कोण कोणाला कुठं नेतोय नगरच्या राजकारणातील दोन दिग्गजांचा हा फोटो चांगलाच होतोय व्हायरल

अहमदनगर दि.२१ जुलै

राज्याच्या राजकारणात सध्या कोण कुठे जातोय याचा पत्ता लागत नाही अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याच्या आणाभाका घेत असतानाच दुसऱ्या दिवशी ते एकनाथ शिंदे गटाकडे निघून गेले त्यामुळे राजकारणात कधी कोण कुठे जाईल याचा नेम नाही. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं नेहमीच बोललं जातं.

अहमदनगर शहरात एक फोटो चांगला चर्चेत आला असून भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकडे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप एकाच गाडीतून जात आहेत मात्र गाडीचे सारथ्य आमदार संग्राम जगताप हे करत असून नेमकं कोण कोणाला कुठे नेत आहे हे समजायला तयार नाही बाबासाहेब वाकळे राष्ट्रवादीत जात आहेत की आमदार संग्राम जगताप यांना बाबासाहेब वाकळे भाजपमध्ये घेऊन जात आहेत. असाच मिश्किल प्रश्न या फोटोकडे पाहून सध्या सोशल मीडियावर विचारला जातोय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version