Homeक्राईमकॉलेज मध्ये शिवजयंती साजरी करू देणार नाही असे म्हणत तरुणास मारहाण

कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी करू देणार नाही असे म्हणत तरुणास मारहाण

advertisement

अहमदनगर दि.१८ जानेवारी

अहमदनगर कॉलेज मध्ये शिवजयंती साजरी करू न देण्यावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून हा सर्व प्रकार सी सी टिव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 30 मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण संदीप पाटील या तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलो असून पुढील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून ती साजरी करण्याची करण पाटील आणि त्याच्या मित्रांनी नियोजन केले होते त्यासंबंधी कॉलेज प्रशासनाशी बोलायला जात असताना काही अज्ञात लोकांनी करण याच्यावर नगर कॉलेजच्या आवारात हल्ला केला असल्याची फिर्याद नोंदवली आहे.

या घटने नंतर नगर कॉलेज बाहेरील एका चायनीज सेंटरची काही अज्ञात तरुणांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे त्यामुळे शहारत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटना समजताच नगर कॉलेज परिसरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली काही तरुणांना चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular