अहमदनगर दिनांक ३ मे
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने पुढील नऊ दिवसात सर्वांचा मोठा धडाका लावण्यात आला आहे याची सुरुवात सात मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे. त्यानंतर आठ मे रोजी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील धनंजय मुंडे तर दुपारी राहुरी येथे धनंजय मुंडे यांचे सभा होणार आहे. नऊ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेड येथे सभा घेणार आहेत. तर त्या दिवशी अजित पवार पारनेर आणि कर्जत मध्ये सभा घेणार आहेत.
९ मे रोजी नितेश राणे यांची पाथर्डी येथे भव्य रॅली असून दहा मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरीत्य सिंधिया यांची श्रीगोंदा येथे सभा होणार आहे. 10 मे रोजी पंकजा मुंडे यांची पाथर्डी येथे तर शेवटच्या दिवशी ११ मे रोजी अहमदनगर शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य रॅली होणार असून त्यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे.
त्यामुळे पुढील आठ दिवस अहमदनगर जिल्ह्यात महायुतीची राज्यसह देशातील मोठ-मोठे नेते येणार असल्यामुळे प्रचाराचा धुरळा चांगलाच उडणार आहे.