HomeUncategorized*निलेश लंके यांच्या रॅली दरम्यान मारहाण झाल्याची मयूर कदम यांचा आरोप.. मयूर...

*निलेश लंके यांच्या रॅली दरम्यान मारहाण झाल्याची मयूर कदम यांचा आरोप.. मयूर कदम यांच्या आईला डोक्याला लागल्याने गंभीर जखमी

advertisement

अहमदनगर दिनांक 3 मे
अहमदनगर शहरातील नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर या परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या आईस बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मयूर कदम या युवकास मारहाण झाली आहे.तर त्याची आई गंभीर जखमी झाली असून या दोघांनाही उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयूर कदम यांच्या आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ही मारहाण निलेश लंके यांची रॅली जात असताना झाल्याचा आरोप मयूर कदम यांनी केला आहे. मयूर कदम यांनी आरोप करताना सांगितले की मी माझ्या आईला रस्त्याने घेऊन जात असताना तिथून निलेश लंके यांची रॅली जात होती त्यावेळी एक माणूस गाडीला अडवा आला त्यास मयूर कदम यांनी बाजूला होण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्याने मयूर कदम यांच्यावर हल्ला केला तो दारू पिला असल्याचे मयूर कदम यांनी सांगितले आहे आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या 20 ते 25 जणांनी मारहाण केल्यामुळे मयूर कदम यांची आई गंभीर जखमी झाल्याचं मयूर कदम यांनी सांगितला आहे.

या प्रकारानंतर मयूर कदम यांच्या आईला उपचारासाठी रुग्णाला दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने टाके घालण्यात आले आहे. त याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचा ही मयूर कदम यांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular