अहमदननगर दि.५ डिसेंम्बर :
आई-वडिल जीवंत असतानाच त्यांची जास्त काळजी करायला हवी. त्यांच्या मृत्यूनंतर अत्यंत भावनिक होवून दाखविलेल्या नैवेद्यालाही नंतर अर्थ उरत नाही. तसेच पैशामुळे गरीब व श्रीमंत, असा मोठा भेदभाव तयार झालेला आहे. जगण्यासाठी माणसाला पैसा आवश्यक आहेच. मात्र. पैसाच सर्वस्व ठरू शकत नाही, असे विचार रामायणाचार्य ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.

गोविंदराव किसनराव लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनसेवेत ते बोलत होते. देवाच्या चरणी लीन झालेल्या नसरी मेहता या महान संताची जीवन कहाणी सांगून समाधान महाराज शर्मा यांनी देवाजवळ कुणाची वर्णी लागते, याचा दाखल दिला. शर्मा महाराज यांच्या वाणीने उपस्थित सर्वचजण अत्यंत तल्लीन झाले होते.गोविंदराव लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बबन लांडगे व राजेंद्र लांडगे परिवारातर्फे श्री सदगुरू हायस्कुल मेहकेरी, या माध्यमिक विद्यालयास शैक्षणिक उपक्रमांसाठी 11,111 रुपयांची देणगी देण्यात आली. रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा, तुळसाबाई लांडगे, राजेंद्र लांडगे व बबन लांडगे यांच्या हस्ते चौधरी सर यांनी या देणगीचा स्वीकार केला.संजीवनी गडाचे ह. भ.प. शंकर भारती महाराज, अहमदनगर जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन भगवानराव बेरड, बाबासाहेब खर्से, सिताराम आडसुळ, अंबादास बेरड यांच्यासह आप्तेष्ट व मित्र परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.





