Homeशहरसामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि साजरा ...

सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि साजरा समृद्धी महामार्गामुळे विकासाची नवे पर्व सुरू झाले – प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

advertisement

अहमदनगर दि.५ डिसेंबर –
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जगातील दीडशे देशांनी मान्य केले आहे भारत देशाला जी -२० च्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे सर्वसामान्य जनतेचे विकासाचे सर्व प्रश्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये साडेपाच कोटी लोकांनी गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतला आहे भारत देश हा एकविसाव्या शतकामध्ये महासत्ता बनविण्याचे काम सुरू आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण केला असल्यामुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांना जोडाला असल्यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्य अदोगतीला घेऊन जाण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला होता. कारोना च्या महामारीच्या काळात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून होते मात्र नरेंद्र मोदी यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे नागरिकांच्या तोंडावरील मास काढण्याचे काम केले आहे भाजपचा शिवसेनेने विश्वासघात केला तर निसर्गानेच त्यांचा बदला घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचे सरकार आले असून महाराष्ट्र राज्य आता विकासाकडे वाटचाल करील भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांनी सामाजिक कार्यातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले हे लोकनेता आहे जिल्ह्याची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखली जात आहे. मतदार संघाच्या विकास कामांसाठी शिवाजीराव कर्डिले हे आमदार नसले तरी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे मतदार संघाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नगर तालुक्यातील नगरदेवळे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश झोडगे यांच्या  वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम,घंटागाडी व विविध मान्यवरांचा गुणगौरव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला यावळी खासदार सुजय विखे पाटील, मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवा मोर्चाचे सरचिटणीस अक्षय कर्डिले, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, मा.महापौर बाबासाहेब वाकळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, अनिल झोडगे,अण्णा चौधरी, राम पानमळकर, हरिभाऊ कर्डिले, राहुल पानसरे, कविता झोडगे, संतोष म्हस्के, सोनू भुजबळ, वसंत राठोड, सुरेश सुंबे, कानिफनाथ कासार, दत्ता तापकिरे, रावसाहेब कर्डिले, संजय ढोणे,अजय चितळे, रभाजी सुळ,अर्चना चौधरी आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की,नगरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलन करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागेत परवानगी दिली आहे लवकरच राज्य सरकार कचरा संकलनासाठी एक एकर जमीन देणार आहे लवकरच महसूल विभाग जिल्ह्यातील अकरावी,बारावी विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले महाविद्यालयात जाऊन दिले जाणार आहे याचबरोबर शासन आपल्या दारी ही योजना घेऊन जाणार आहे व गावातील प्रश्न गावातच मार्गी लावली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात समाजकारणाचा धागा धरत दिलेले शब्द पूर्ण करत आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहायचे आहे मतदारसंघांमध्ये रस्त्याचे जाळे उभे राहत आहे नगर शहराच्या बायपासचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.उड्डाण पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. नगर कर्जत रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे नगर जिल्ह्यातील नागरिकांना नागपूरला जाण्यासाठी बारा तास लागत होते परंतु आता अगदी चार तासात पोहोचणार आहेत हा विकास आहे असे ते म्हणाले.
मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, माजी मंत्री यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी या ग्रामपंचायत रद्द करून नगरपंचायत केल्या मात्र कुठल्याही विकासाच्या सुविधा दिल्या नाही आता आम्ही पुन्हा या ग्रामपंचायत केल्या आहेत व विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू झाले आहे खासदार सुजय विखे यांनी कचरा डेपो चा प्रश्न मार्गी लावला आहे विकास कामामुळेच या परिसरामध्ये नागरी वसाहती वाढत आहेत महेश झोडगे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून या भागातील नागरिकांचा विश्वास संपादित केला आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविली आहे असे ते म्हणाले.

 – महेश झोडगे यांनी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी भागाच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला व तो मार्गी लागला तसेच नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलनासाठी घंटागाड्या सुरू केल्या याचबरोबर गरजू विद्यार्थी मोहम्मद कैफ या विद्यार्थ्याचे शैक्षणिक खर्च उचलण्याचे काम केले याचबरोबर समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा गुणगौरव करण्यात आला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular