अहमदनगर दि. 21 नोव्हेंबर
अनेक वर्षापासून बहुचर्चित राहिलेला उड्डाणपूल अखेर पूर्ण झाला असून या उड्डाण पूलाचा लोकार्पण सोहळा 19 नोव्हेंबर रोजी देशाचे केंद्रीय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नगर शहरातील शिल्पा गार्डन येथे पार पडला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्यस्त कार्यक्रमात अर्धा तास त्यांनी अहमदनगर शहरात या लोक अर्पण सोहळा दिला होता. या कार्यक्रमात त्यांचे आगमन थेट माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोरील हेलीपॅड वर झाले त्यानंतर ते भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी जाऊन पुढे कार्यक्रमासाठी रवाना झाले होते.
कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी केली गेली होती मात्र या ठिकाणी पत्रकार कक्षात पत्रकांपेक्षा इतर लोकांची गर्दी जास्त दिसून आली तर उड्डाणपुराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पत्रकारांना माहितीपत्रक देण्यात आले नाही तसेच हा कार्यक्रम काही ठराविक भाजप नेत्यांचा होता का असाच प्रश्न कार्यक्रमावेळी दिसून आला. कारण अनेक भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महापौर, माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक यांना बसण्यासाठी खुर्च्या मिळत नसल्याने अखेर त्यांना पत्रकारांच्या समावेत बसण्याची वेळ आली होती. मात्र व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची हजेरी ठळकपणे जाणवली होती त्यामुळे या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि एकनिष्ठ नेते शेवटच्या रांगेत तर आयाराम आणि इतर पक्षातील नेतेच व्यासपीठावर दिसून आल्याचे चित्र पाहायला मिळालं त्यामुळे हा कार्यक्रम नेमका भाजपचा होता शासकीय होता का खाजगी कंपनीचा होता हे मात्र कळू शकले नाही.
यावेळी भाषणा प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या बाबत दोन वेळा स्तुती केली मात्र या उड्डाणपणासाठी योगदान देणाऱ्या शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचा एकदाही नाम उल्लेख केला नाही अखेर संपूर्ण भाषण संपल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येऊन अनिल राठोड यांचा उल्लेख राहिला असल्याचे स्टेजवरून सांगितलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा या पुलावर रेखाटण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ज्यांनी दिली त्यांनी या पुलाच्या योगदानात माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचेही हातभार असल्याचे का सांगितलं नाही असा सवाल आता उपस्थित राहतोय.
या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी थेट पाईपलाईन रोडवरील एका टोकावरून महिला आणि तरुणांची गर्दी आणण्यात आली होती शहरातील नागरिकांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.