Homeविशेषउड्डाणपूल होण्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी आणि स्वर्गीय...

उड्डाणपूल होण्यासाठी मोठे योगदान देणाऱ्या स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी आणि स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा का नाही? सरकारी पगार घेणारे दिवाण साहेबांचा आणि ठेका घेणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर शेळके चा सत्कार होतो तर गांधी,राठोडांच्या कुटुंबियांचा सत्कार का नाही?

advertisement

अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला यावेळी या उड्डाणपुलासाठी योगदान देणाऱ्या नॅशनल हायवे प्राधिकरणाचे अधिकारी दिवाण यांचा सपत्नीक सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला असा सत्कार होत असताना त्यांनी या उड्डाणपुलाच्या कामात दिलेल्या योगदानाबद्दल सांगण्यात आलं दिवान हे सरकारी अधिकारी आहेत सरकारचा पगार घेऊन त्यांनी हे काम केलं त्यात काही मोठी गोष्ट नाही. मात्र त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला यातही काही गैर नाही त्याचवेळी या कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांसह या ठिकाणी असलेल्या शेळके नामक व्यक्तीचाही नाम उल्लेख वारंवार करण्यात आला त्यातही काही गैर नाही मात्र हे सर्व सरकारचा पगार घेऊन अथवा ठेकेदारीतून मिळणाऱ्या नागरिकांच्या कर रुपी पैशातून हा पूल होत आहे. मात्र हा पुल होण्यासाठी सुरवातीपासून योगदान देणाऱ्या आणि पाठपुरा करण्यात करणाऱ्या आणि खरंच ज्या तळमळीने काम करणारे स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांचा सत्कार होणे गरजेचे होते. किमान त्यांना व्यासपीठावर स्थान देऊन यांचा सन्मान वाढवणे गरजेचे असताना व्यासपीठाच्या समोर स्व. दिलीप गांधी यांच्या कुटुंबीयांना बसवण्यात आले होते ही खेदाची बाब आहे. ज्या दिलीप गांधींनी या शहरातील उड्डाणपुलाचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्या दिलीप गांधींच्या कुटुंबांचा सन्मान होणे गरजेचे होते मात्र तसे या कार्यक्रमात झाले नाही हे विशेष.

त्याचप्रमाणे बँडेज बांधून आंदोलन करणारे उड्डाणपुलासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणारे मुंबई दरबारी जाऊन पुलासाठी पाठपुरावा करणारे स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबीयांचा सन्माननीयही गरजेचे असताना त्यांचा नाम उल्लेख कार्यक्रमाच्या शेवटी होणे ही खेदाची बाब आहे. ज्या लोकांनी खरंच या पुलासाठी योगदान दिलं आहे अशा तत्कालीन शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला व्यासपीठावर स्थान न देणे म्हणजे हा त्यांचा अपमान होता.

सरकारी पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांचा सत्कार होतो आणि खऱ्या अर्थाने योगदान देणाऱ्या लोकांचा अपमान या कार्यक्रमात केला गेला नगरकरांच्या दृष्टीने हा उड्डाणपूल स्वर्गीय खासदार दिलीप गांधी आणि स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्याच प्रयत्नांमुळे झालेला आहे हे सर्वश्रुत असताना त्यांच्या कुटुंबीयांना डावलने म्हणजे समस्त नगरकरांचा अपमान करणे असेच होय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular