Home जिल्हा नगर कल्याण रोड वर कार आणि बसचा भीषण अपघात नगरच्या एकाचा मृत्यू

नगर कल्याण रोड वर कार आणि बसचा भीषण अपघात नगरच्या एकाचा मृत्यू

आळेफाटा दि.१२ जुलै नगर-कल्याण
महामार्गावर राजुरी शिवारात कार आणि बस यांच्यात
समोरासमोर धडक झल्याने भीषण अपघात झाला आहे यात इको कारमधील गुलशन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला असून गाडीतील मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले असून बस मधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे .

ही घटना सोमवारी रात्री घडली असून नगर-कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला राजुरीकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भयानक होता की कारचा चक्कचूर झाला.या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दवखण्यात हलवले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version