HomeUncategorizedअहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी निवडणुकॲड. संदीप पाखरे ॲड. विनायक सांगळे...

अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी निवडणुकॲड. संदीप पाखरे ॲड. विनायक सांगळे बिनविरोध .. उर्वरीत १० जागांसाठी बार असोशिएशंच्या आजी- माजी पदाधिकारी-संचालकांमध्ये लढत..

advertisement

अहमदनगर दि.२४ मार्च

अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटी पंचवार्षिक निवडणुक होत असुन अनुसुचित जाती जमाती मतदार संघातुन ॲड. संदीप पाखरे आणि विमुक्त जाती मतदार संघातुन विनायक सांगळे यांनी बिनविरोध बाजी मारली आहे..

१२ जागेंपैकी २ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत १० जागांमधील चुरस वाढली असुन सर्वसाधारण, महिला, आणि नागरीकांच्या मागास प्रवर्ग या सर्व जागेंसाठी अहमदनगर बार असोशिएशन चे माजी माजी अध्यक्ष,पदाधिकारी, माजी चेअरमन माजी संचालक एकमेकांसमोर उभे असल्याने लढत चुरशीची झाली आहे.सर्वसाधारण जागेसाठी बार चे माजी अध्यक्ष ॲड. भुषण बऱ्हाटे, ॲड. लक्ष्मण कचरे, लॉयर्स सोसायटीचे विद्यमान संचालक ॲड. ऱविद्र शितोळे, नोटरी असोशिएनचे पदाधिकारी ॲड. सुमतीलाल बलदोटा, जेष्ठ वकिल ॲड. नामदेव वाकळे, ॲड. सुनिल सुर्यवंशी, ॲड. हफिज जहागिरदार, ॲड. रावसाहेब बडे, यांच्या सह शहर बार असोशिएन चे सदस्य ॲड. संदीप काळे, ॲड.संदीप पडोळे, ॲड. सुधिर कुलकर्णी नशीब अजमावत असुन इतर मागास प्रवर्ग जागेसाठी विद्यमान संचालक ॲड. प्रभाकर शहाणे, बार असोशिएशनचे विद्यमान सहसचिव ॲड. सुनिल तोडकर बार असोशिएशनचे माजी पदाधीकारी ॲड. चंदन बारटक्के तर महिला प्रवर्गासाठी बार असोशिएशन च्या माजी सचिव व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या विद्यमान सचिव ॲड. अनिता दिघे, माजी महिला सचिव ॲड. वृषाली काळे – तांदळे आणि विद्यमान संचालिका ॲड. मिनाक्षी कराळे संचालक पदासाठी निवडणुक लढत असुन दिनाक ६/४/२०२३ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतीम मुदत असुन निवडणुक बिनविरोध न झाल्यास सुमारे ९६८ सुज्ञ वकील मतदार असलेल्या अहमदनगर लॉयर्स को ऑप क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळासाठी बार असोशिएशचे आणि लॉयर्स सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी-संचालक यांच्यातील अतितटीची आणि चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular